शिंदे-भाजप-काँग्रेसची अशीही ‘युती’, बालेकिल्ल्यातच ठाकरेंना एकटं पाडलं! मुंबई महापालिका सुधारणा विधेयक मंजूर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना आणखी एक धक्का दिला आहे. विधानसभेमध्ये आज मुंबई महापालिका सुधारणा विधेयक मंजूर करण्यात आलं आहे. मुख्य म्हणजे हे विधेयक मंजूर करून घेताना काँग्रेस आणि समाजवादी पक्षानेही शिवसेनेला एकटं पाडलं.
3 ऑगस्टला झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मुंबई महापालिका निवडणुकीसाठी महाविकासआघाडी सरकारने घेतलेला निर्णय रद्द करत पुन्हा एकदा 2017 प्रमाणेच 227 वॉर्डांची रचना ठेवण्याचा अध्यादेश काढला. यानंतर आता या अध्यादेशाचं विधेयक विधानसभेमध्ये मंजूर करून घेण्यात आलं.
हृताचं ओटीटीवर पदार्पण, पहिल्या वहिल्या वेब सीरिजची फर्स्ट लुक आला समोर
महाराष्ट्राची लाडकी क्रश अर्थात सर्वांची लाडकी अभिनेत्री हृता दुर्गुळे. टेलिव्हिजन, रंगभूमी आणि सिनेमाच्या माध्यातून हृतानं प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. टाईमपास 3 आणि अनन्या या दोन दमदार सिनेमांना प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला. अभिनय आणि त्यासाठी घेतलेल्या मेहनीसाठी हृताचं प्रचंड कौतुक होत आहे. नुकतंच हृताचं लग्न देखील झालं. या सगळ्यात हृतानं तिच्या लाडक्या प्रेक्षकांनी आणखी एक मोठ सरप्राइज दिलं आहे. टेलिव्हिजन, रंगभूमी आणि सिनेमानंतर हृता आता ओटीटीवर पदार्पण करत आहे. हृताच्या पहिल्या वहिल्या वेब सीरिजची नुकतीच घोषणा झाली असून अभिनेत्रीनं वेब सीरिजचा पहिला लुक सोशल मीडियावर शेअर केला आहे.
महिला अत्याचार प्रकरणी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुखला कोर्टाचा दणका!
लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार केल्याच्या आरोपात भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांना कोर्टाने आज मोठा दणका दिला आहे. सोलापूर जिल्हा न्यायालयाने श्रीकांत देशमुख यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. या निर्णयानंतर देशमुख उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे समजते.
मुंबईतलं प्रसिद्ध ललित हॉटेल उडवण्याची धमकी देणाऱ्यांच्या नांग्या ठेचल्या, पोलिसांची मोठी कारवाई
मुंबईतील प्रसिद्ध ललित हॉटेल उडवून देण्याची धमकी देऊन 5 कोटींची मागणी करणाऱ्या एका संशयिताला मुंबई पोलिसांनी गुजरातच्या वलसाड येथून केली अटक केली आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, आरोपीची मानसिक स्थिती स्थिर आहे. आरोपींनी हॉटेल प्रशासनाकडे पहिल्या कॉलमध्ये 5 कोटी मागितले होते आणि नंतर तडजोड करून 3 कोटींची मागणी केली होती
सहार पोलिसांनी आरोपीच्या शोधात गुजरात गाठले आणि त्याला वलसाड येथून ताब्यात घेतले. सहार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. या लोकांनी गुगलवरून ललित हॉटेलचे नंबर काढले होते आणि बॉम्बची धमकी दिली होती. ताब्यात घेतल्यानंतर दोन्ही संशयित आरोपींनी मानसिक त्रास झाल्याचे भासवले. मात्र तो पूर्णपणे निरोगी आहे. बॉम्बची धमकी देऊन 5 कोटी रुपयांची खंडणी मागण्या मागे त्याचा खरा हेतू काय होता? याची चौकशी करण्यात येत आहे.
पुण्यात भर सभेत राज्यपाल आणि आमदार-खासदारांची जुगलबंदी, एकमेकांना चिमटे आणि टोमणे
पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि हुतात्मा राजगुरू यांच्या 114 व्या जयंती निमित्ताने आज कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमातच राष्ट्रवादी काँग्रेचे स्थानिक आमदार दिलीप मोहिते पाटील आणि खासदार अमोल कोल्हे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भर सभेतच चिमटे काढले. यामुळे चांगलीच जुगलबंदी रंगलेली बघायला मिळाली.
“आत्ताचे सरकार राज्यपालांचे ऐकणारे सरकार आहे”, असं सांगत आमदार दिलीप मोहिते यांनी राज्यपालांना लक्ष केलं. तर “आमदारच हा कामदार असतो आणि राज्यपाल नामधारी असतो”, असं उपहासात्मक प्रत्युत्तर भगतसिंह कोश्यारी यांनी दिलं. या जुगलबंदीने उपस्थितांत चांगलीच हशा पिकली. त्यातच खासदार अमोल कोल्हे यांनीही उडी घेत काही दिवसांपूर्वी राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या गुरुबद्दल केलेल्य वादग्रस्त विधानाला छेडले आणि ठणकावून सांगितल की छत्रपतींचे गुरु हे त्यांचे आई-वडील होते.
विद्यार्थ्यांनो, आधारकार्ड असेल तरच मिळणार खिचडी!
शालेय विद्यार्थ्यांचेयोग्य पोषण व्हावे यासाठी केंद्र सरकारनं शालेय पोषण आहार योजना सुरू केली. गेल्या दीड दशकापासून ही योजना सुरू आहे. यापूर्वी विद्यार्थ्यांना दर महिन्याला 3 किलो मोफत तांदूळ मिळत असे. त्यानंतर 2001 साली सर्वोच्च न्यायालयाने 2001 साली शालेय पोषण आहारात विद्यार्थ्यांना तांदूळ घरी न देता शिजवलेले अन्न देण्याचे आदेश दिले. त्यानुसार विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहाराच्या अंतर्गत खिचडी देण्यात येऊ लागली. त्यावेळी योजनेचे स्वरूप विद्यार्थ्यांना प्रतिमाह ३ किलो मोफत तांदूळ देणे अशा स्वरुपाचे होते. त्यानंतर २००१ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने शालेय पोषण आहार योजनेमध्ये विद्यार्थ्यांना तांदूळ घरी न देता शिजवलेले अन्न द्यावे, अशा स्वरुपाचे आदेश दिले. मात्र, शालेय पोषण आहार योजनेंतर्गत दिल्या जाणाया खिचडीचा लाभ घ्यायचा असेल तर विद्यार्थ्यांची आधार जोडणी बंधनकारक करण्यात आली आहे.
कर्ज फेडता न आल्याने मुले, पत्नीची हत्या करुन वडिलांनी संपवलं जीवन
ऑनलाइन अॕपच्या माध्यमातून घेतलेल्या कर्जामुळे आलेल्या तणावातून एकाने आपल्या परिवाराची हत्या करुन नंतर गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटनेने एकच खळबळ उडाली आहे. अमित यादव असे आरोपी मृताचे नाव आहे. ही घटना मध्य प्रदेशातील इंदूर येथे घडली. अमित यादवने आपल्या पत्नी आणि दोन मुलांची हत्या केली.
काँग्रेसचं YouTube चॅनल अचानक डिलीट, नेमका प्रकार काय?
राज्यात सध्या हिवाळी अधिवेशन सुरु आहे. या हिवाळी अधिवेशनादरम्यान सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील सुरु असलेलं घमासान संपूर्ण महाराष्ट्र आणि देश पाहत आहे. या घटना पाहिल्यानंतर महाराष्ट्राला असलेली राजकीय परंपरा आज टिकून राहिलीय का? असा प्रश्न उपस्थित होतोय.या सगळ्या घडामोडी एकीकडे घडत असताना काँग्रेसच्या गोटातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. काँग्रेसचं अधिकृत YouTube चॅनल अचानक डिलीट करण्यात आलं आहे. त्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
काँग्रेसकडून याबाबत अधिकृत माहिती जारी करण्यात आली आहे. आमचे YouTube चॅनल ‘भारतीय राष्ट्रीय काँग्रेस’ हटवण्यात आले आहे. आम्ही त्याचे निराकरण करत आहोत आणि Google/YouTube टीमच्या संपर्कात आहोत. तांत्रिक बिघाड झालाय की काही छेडछाडीचा हा प्रकार आहे याचा आम्ही तपास करत आहोत. आमचे YouTube चॅनल लवकरच पूर्ववत सुरु होईल, अशी आशा आहे, अशी माहिती काँग्रेसच्या अधिकृत सोशल मीडिया विभाग हाताळणाऱ्या टीमकडून देण्यात आली आहे.
मेक्सिकोत ज्यांचा पुतळा उभारला ते मराठमोळे पांडुरंग खानखोजे
आपण या वर्षी देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत आहोत. देशाच्या स्वातंत्र्यासाठी असंख्य देशवासीयांनी प्राणांची आहुती दिली. त्यापैकी काहींनी क्रांतीचा मार्ग पत्करला तर काहींनी अहिंसेचा. या स्वातंत्र्याच्या समरात आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या वीरांचा आपण नेहमीच सन्मानाने उल्लेख करतो. काही क्रांतीकारक, हुतात्मे मात्र सामान्य माणसांच्या विस्मरणात गेले आहेत. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला सध्या कॅनडा दौऱ्यावर आहेत. 65 व्या कॉमनवेल्थ पार्लमेंटरी कॉन्फरन्ससाठी ते हॅलिफॅक्सला गेले आहेत.
त्यांच्या या भेटीला महत्त्व अशासाठी आहे की या भेटीत ओम बिर्ला मेक्सिकोमध्ये जाऊन स्वामी विवेकानंद आणि क्रांतीकारक, शेतीतज्ज्ञ पांडुरंग खानखोजे यांच्या पुतळ्यांचं अनावरण करणार आहेत. खानखोजे यांनी मेक्सिकोत राहून शेतीमध्ये अनेक प्रयोग केले शेतीच्या विकासात मोठं योगदान दिलं होतं. त्यामुळे त्यांना मेक्सिकोत प्रचंड मान आहे. त्यामुळे त्यांचा पुतळा तिथे उभारला जात आहे. याबाबतचं वृत्त फर्स्ट पोस्टनं दिलं आहे.
तुमच्याकडेही बेनामी संपत्ती आहे; सरकार कधी करू शकते प्रॉपर्टी जप्त?
देशभरात गेल्या काही दिवसांपासून अनेक राज्यात छापेमारी केली जात आहे. यात मोठ्या प्रमाणात संपत्तीही जप्त करण्यात आली आहे. मात्र, अशी बेनामी संपत्ती सरकारला जप्त करता येते का? कायदा काय सांगतो? बंगालमध्ये गणपती डीलकॉम प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी आहे. बेनामी संपत्ती प्रकरणी तिच्यावर कारवाई झाली होती. त्यानंतर त्यांनी त्याविरोधात कोलकाता उच्च न्यायालयात धाव घेतली. तेथे त्यांनी आव्हान दिले की बेनामी मालमत्ता कायद्यांतर्गत 2016 पूर्वीच्या प्रकरणांमध्ये सरकार कोणतीही कारवाई करू शकत नाही किंवा शिक्षा करू शकत नाही.
कोलकाता उच्च न्यायालयाने गणपती डीलकॉम प्रायव्हेट लिमिटेडच्या बाजूने निकाल दिला. त्यांनीही तोच निकाल दिला, जो सर्वोच्च न्यायालयाने आता दिला आहे. कोलकाता उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात केंद्र सरकार सर्वोच्च न्यायालयात गेले. डिसेंबर 2019 मध्ये, कोलकाता उच्च न्यायालयाने बेनामी व्यवहार (निषेध) कायदा 2016 मध्ये सुधारणा पूर्वलक्षी प्रभावाने, म्हणजे पूर्वलक्षी प्रभावाने लागू केली जाऊ शकत नाही, असे ठरवले होते.
बिहारमध्ये ‘महागठबंधन सरकार’वर शिक्कामोर्तब! मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी विधानसभेच्या विशेष अधिवेशनात आवाजी मतदानाने विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. जनता दल युनायटेडचे सर्वेसर्वा नितीश कुमार यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल करत भाजपा आमदारांनी सभात्याग केला. विश्वासदर्शक ठरावापूर्वी भाजपा नेते विजय कुमार यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. सत्ताधारी आमदारांनी कुमार यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव मांडला होता.
या आमदारांना लाज वाटली पाहिजे”; विधानभवनातील धक्काबुक्कीवर रविकांत तुपकरांची संतप्त प्रतिक्रिया
आज अधिवेशन सुरू होण्यापूर्वी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये धक्काबुक्की झाल्याचा प्रकार घडला. त्यावरून आता आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. दरम्यान, स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांनी याप्रकारावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. नळावर जसे भांडणं होतात, तसे भांडणे हे विधान भवनामध्ये होत आहेत. या आमदारांना थोडी तरी लाज वाटली पाहिजे, असे ते म्हणाले.
सोनाली फोगट मृत्यू प्रकरणाला नवं वळण; खोलीतून लॅपटॉप गायब झाल्याचा कुटुंबियांचा आरोप
टिकटॉक स्टार आणि भाजपा नेत्या सोनाली फोगट यांचा गोव्यात मृत्यू झाला. त्यांचा मृत्यू हार्ट अटॅकने झाल्याची माहिती समोर आली होती. परंतु सोनाली यांचा मृत्यू नैसर्गिक नसून घातपाताचा संशय त्यांच्या बहिणीने व्यक्त केला होता. आता या प्रकरणाने वेगळं वळण घेतलं आहे. सोनाली जिथे थांबल्या होत्या त्या ठिकाणाहून त्यांचा लॅपटॉप गायब असल्याची बाब समोर आली आहे.
आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत शुभमन गिलची ‘हनुमान उडी’
बुधवारी ‘आयसीसी’ने एकदिवसीय फलंदाजांची क्रमवारी जाहीर केली. या क्रमवारीत भारताचा समामीवीर फलंदाज शुभमन गिल ४५ स्थानांनी झेप घेत ३८व्या स्थानावर पोहोचला आहे. तर विराट कोहलीने आपले स्थान पाचवे स्थान कायम ठेवले आहे.
SD Social Media
9850 60 3590