बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन यांना पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. बिग बी यांनी स्वत: ट्विट करून याबाबत माहिती दिली. 2020 मध्ये बिग बींना कोरोनाचा लागण झाली होती. यावेळी अभिषेक बच्चनसह ऐश्वर्या राय हिलादेखील कोरोनाची लागण झाली होती.
यानंतर बिग बी आणि अभिषेक बच्चन साधारण एक महिन्यापर्यंत रुग्णालयात दाखल होते. 7 ऑगस्टपासून केबीसीच्या 14 व्या सीजनची सुरुवात झाली आहे. त्यात आता अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. बिग बींनी त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं ट्विट केल्यानंतर चाहत्यांकडून त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली जात आहे. तिसऱ्यांदा बिग बींना कोरोनाची लागण झाली आहे.
11 जुलै 2020 रोजी अमिताभ यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांना नानावटी या रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. चार दिवसांनंतर अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय आणि अमिताभ यांची नात आराध्याला देखील कोरोनाची लागण झाली होती.
यानंतर 2022 च्या जानेवारी महिन्यातही बिग बींना कोरोनाची लागण झाली होती. यावेळी अमिताभ बच्चन यांच्या घरी काम करणाऱ्या एकूण 31 कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यापैकी एक कर्मचारी पॉझिटिव्ह आढळला होता.