आज दि.११ नोव्हेंबर च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

कोकण किनारपट्टीवरील प्रदूषण धोकादायक पातळीवर, रसायनांमुळे सागरी आणि मानवी आरोग्य धोक्यात

राज्याला लाभलेली ७२० किलोमीटरची कोकण किनारपट्टी प्रदूषणामुळे धोकादायक पातळीवर पोहोचल्याचे संशोधनातून समोर आले आहे. किनारपट्टी प्रदूषित करणाऱ्या घटकांमध्ये सूक्ष्म प्लॅस्टिक, औषधांतील रासायनिक घटकांचा समावेश असून, या प्रदूषणामुळे सागरी जीवन आणि मानवी आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.राज्याला लाभलेली ७२० किलोमीटरची कोकण किनारपट्टी प्रदूषणामुळे धोकादायक पातळीवर पोहोचल्याचे संशोधनातून समोर आले आहे. किनारपट्टी प्रदूषित करणाऱ्या घटकांमध्ये सूक्ष्म प्लॅस्टिक, औषधांतील रासायनिक घटकांचा समावेश असून, या प्रदूषणामुळे सागरी जीवन आणि मानवी आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.

“शाखा पाडली, बॅनर्स फाडले, निवडणुकीत तुमची मस्ती फाडतो”, मुंब्र्यात उद्धव ठाकरे कडाडले

सत्तेचा माज आलेल्यांनी बुलडोझरने शिवसेनेची शाखा पाडली. पण, खरा बुलडोझर घेऊन मी मुंब्र्यातील रस्त्यावर आलो आहे. आपली बॅनर फाडल्याचं मला कळलं. मात्र, निवडणुका येऊद्या तुमची मस्ती फाडतो, असा इशारा शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाला अप्रत्यक्षपणे दिला आहे. ते मुंब्र्यात कार्यकर्त्यांना संबोधित करत होते.उद्धव ठाकरे म्हणाले, “पोलिसांचं धन्यवाद मानतो. कारण, त्यांनी शाखाचोरांचं रक्षण केलं. प्रशासन हतबल झाल्याचं संपूर्ण महाराष्ट्र पाहत आहे. आज येथे काही घडलं असतं, तर महाराष्ट्राची अब्रू गेली असती. सत्तेची गादी भोगणाऱ्यांनी आधीच महाराष्ट्राची अब्रू घालवली आहे.”

शिंदे गटात वादाची ठिणगी! गजानन कीर्तिकरांनी रामदास कदमांचा ‘गद्दार’ म्हणून केला उल्लेख

मुंबईतील उत्तर-पश्चिम लोकसभा मतदासंघावरून शिवसेना ( शिंदे गट ) खासदार गजानन कीर्तिकर आणि रामदास कदम यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. आता हा वाद टोकाला गेला आहे. पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसू नका, असं थेट हल्लाबोल रामदास कदमांनी गजानन कीर्तिकरांवर केला होता. याला गजानन कीर्तिकरांनी प्रत्युत्तर दिलं आहे. गद्दार रामदास कदमांच्या तोंडी दुसऱ्यांच्या गद्दारीची भाषा हास्यास्पद आहे, अशी टीका गजानन कीर्तिकरांनी केली आहे.

“मी मराठा समाजाला हात जोडून विनंती करतो की…”, मनोज जरांगे पाटील यांचं महत्त्वाचं आवाहन

मी महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला हात जोडून विनंती करतो, की कुणीही आत्महत्या करु नका. आंदोलन जिवंत राहूनच करा. आत्महत्या करुन काहीही होणार नाही. आपल्या लेकरांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण सगळे एकत्र येऊन प्रयत्न करु. १ डिसेंबरपासून साखळी उपोषण सुरु करा असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. जीवन संपवून आपल्या मराठ्यांना न्याय मिळणार नाही. आपल्या डोळ्यांदेखत समाजाला न्याय देण्यासाठी लढा असं जरांगे पाटील म्हणाले आहेत.

चंद्रकांत पाटलांवर शाई फेकणाऱ्या भीम आर्मीच्या शहराध्यक्षावर तडीपारीची नोटीस

सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अंगावर शाईफेक करणाऱ्या भीम आर्मीच्या शहराध्यक्षावर पोलिसांनी सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातून तडीपार करण्याची नोटीस बजावली आहे. गेल्या १५ ऑक्टोबर रोजी सात रस्त्यावरील शासकीय विश्रामगृहात प्रचंड पोलीस बंदोबस्त असतानाही पाटील यांच्या अंगावर शाई फेकण्याचा प्रकार घडला होता.

श्रीनगरमध्ये हाऊसबोटला लागलेल्या आगीत बांगलादेशच्या तीन पर्यटकांचा मृत्यू

श्रीनगरमध्ये पाच हाऊसबोट जळून खाक झाल्या आहेत. दाल लेक या ठिकाणी या हाऊसबोट उभ्या होत्या. त्यांना आग लागली. या ठिकाणी मदत आणि बचाव कार्य सुरु करण्यात आलं. तसंच बांगलादेशच्या तीन पर्यटकांचा मृत्यू झाल्याचंही समजतं आहे.ज्या तीन बांगलादेशी प्रवाशांचा जळून मृत्यू झाला ते तिघेजण सफीना या हाऊसबोटवर होते. या हाऊसबोट्सना जी आग लागल्याची घटना घडली त्या घटनेत हे पर्यटकही सापडले. त्या सगळ्यांचा होरपळून मृत्यू झाला. आज पहाटे सगळ्या हाऊस बोट्सना आग लागल्याची घटना घडल्याचं पोलिसांनी सांगितलं.

प्रत्यक्ष कर संकलन २२ टक्क्यांनी वाढून १०.६० लाख कोटींवर

देशाचे निव्वळ प्रत्यक्ष कर संकलन नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत वार्षिक तुलनेत २२ टक्क्यांनी वाढून १०.६० लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त झाले आहे. जे संपूर्ण वर्षासाठी अर्थसंकल्पीय उद्दिष्टाच्या ५८ टक्के आहे, अशी माहिती प्राप्तिकर विभागाने शुक्रवारी दिली

‘अफगाणिस्तानने या विश्वचषकात पाकिस्तानपेक्षा सरस खेळ केला’

अफगाणिस्तान संघाने या विश्वचषक स्पर्धेतील आपली मोहीम संपवली असून उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. त्याचवेळी, हे अशक्य असले तरी, पाकिस्तानला उपांत्य फेरी गाठण्याची संधी हुकली आहे. दरम्यान, पाकिस्तानच्या माजी खेळाडूंनी या स्पर्धेतील आपल्या संघाच्या कामगिरीची तुलना करण्यास सुरुवात केली आहे. आपल्या संघाच्या कामगिरीबद्दल दोन माजी कर्णधार म्हणाले की, जर आपण फक्त विश्वचषकाबद्दल बोललो तर यावेळी अफगाणिस्तानचा संघ पाकिस्तानपेक्षा खूपच चांगला खेळला आहे.

SD Social Media

9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.