आज दि.३ आॕक्टोबर च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

भोवानीपूर पोटनिवडणुकीत
ममता बॅनर्जी विजयी

पश्चिम बंगालमधील भोवानीपूर पोटनिवडणुकीत ममता बॅनर्जी विजयी झाल्या आहेत. पश्चिम बंगालच्या महत्त्वाच्या अशा भवानीपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी ३० सप्टेंबर रोजी मतदान पार पडल्यानंतर, सकाळी आठ वाजेपासून सुरू असलेल्या मतमोजणीकडे लागले होते. ममता बॅनर्जी यांनी या पोटनिवडणुकीत भाजपाच्या प्रियंका टिबरेवाल यांचा ५८ हजारांपेक्षा अधिक मतांनी पराभव केला.

उरी सेक्टरमध्ये २५ ते ३०
किलो हेरॉईन जप्त

लष्कराने नियंत्रण रेषेजवळील उरी सेक्टरमध्ये २५ ते ३० किलो हेरॉईन जप्त केले आहे. त्याची किंमत २५ कोटींपेक्षा जास्त असल्याचे सांगितले जात आहे. हे सर्व पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. भारतीय लष्कराच्या जवानांनी उरी सेक्टरमधील नियंत्रण रेषेजवळ दोन पिशव्या जप्त केल्या, ज्यात पाकिस्तानी चिन्हांसह पिशव्यांमध्ये २५-३० किलो हेरॉईन सारखा पदार्थ होता. बारामुल्ला पोलीस स्टेशमध्ये याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

शाहरुख खानचा मुलगा
आर्यन खान रेव्ह पार्टीत

मुंबईच्या समुद्रात क्रूझवर सुरु असलेल्या एका रेव्ह पार्टीवर कारवाई करत अमली पदार्थ विरोधी पथकाने (एनसीबी) आठ जणांना ताब्यात घेतलं आहे. एनसीबीने केलेल्या या कारवाईमुळे बॉलिवूडमध्ये मोठी खळबळ माजली आहे. याचं कारण म्हणजे ताब्यात घेतलेल्यांमध्ये बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचाही समावेश आहे. आर्यन खानचा जवळचा मित्र अरबाज मर्चंटदेखील यावेळी उपस्थित होता. या सर्वांची सध्या एनसीबी अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरु आहे.

सुपस्टारचा मुलगा असला
तरी कारवाई होणारच

अमली पदार्थ विरोधी पथक (एनसीबी) प्रमुख एस.एन.प्रधान म्हणाले की, ताब्यात घेण्यात आलेल्यांपैकी सुपस्टारचा मुलगा आहे की नाही आहे, याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही. आम्ही हे तपासत आहोत की यापैकी ड्रग्जशी कोण जुडलेले आहेत. जे ड्रग्जशी जुडलेले असतील, मग ते कुणाचाही मुलं असोत, कोणत्याही पदावरील असो त्यांच्यावर कारवाई होणारच. अनेक दिवसांपासून आम्हाला थोडीफार माहिती मिळत होती, जेव्हा खात्रीशीर माहिती मिळाली तेव्हा त्या क्रूझवर कारवाई केली गेली.”

गौतम अदानी कुटुंबाने २०२१ मध्ये
रोज १,००२ कोटी रुपये कमावले

गौतम अदानी आणि कुटुंबाने २०२१ मध्ये प्रतिदिन सर्वाधिक १,००२ कोटी रुपये कमावले आहेत. ज्यामुळे ते आयआयएफएल वेल्थ हुरुन इंडिया रिच लिस्ट २०२१ नुसार ५.०५ लाख कोटी रुपये संपत्ती असणारे भारतातील दुसरे सर्वात श्रीमंत कुटुंब बनले आहेत. तर, रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबाने २०२० मध्ये शेवटची यादी जाहीर झाल्यापासून दररोज १६३ कोटी रुपये कमावले असून त्यांची संपत्ती ७.१८ लाख कोटी रुपये आहे. तर, एलएन मित्तल कुटुंबाने ३१२ कोटी रुपये कमावले असून शिव नादर आणि कुटुंबाने २६० कोटी रुपये कमावले आहेत.

कोळसा नसल्याने वीज निर्मिती
ठप्प होण्याची शक्यता

भारतातही वीज निर्मितीचं मोठं संकट उभं राहिलं आहे. केंद्रीय ऊर्जा मंत्रालय आणि अन्य एजेंसीच्या आकडेवारीनुसार तज्ज्ञांनी हा इशारा दिला आहे. मंत्रालयातील आकडेवारी नुसार देशातील एकूण 135 औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रांपैकी फक्त 72 केंद्रांमध्ये 3 दिवस पूरेल इतकाच कोळसा शिल्लक राहिला आहे.

हिमाचल प्रदेशच्या पोटनिवडणुकीत
अभिनेत्री कंगना असणार उमेदवार

हिमाचल प्रदेशच्या मंडी सीटवर होणाऱ्या पोटनिवडणुकीत बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत उमेदवार असू शकते. भाजप खासदार रामस्वरूप शर्मा यांचे या वर्षी मार्चमध्ये निधन झाले होते. तेव्हापासून ही जागा रिक्त आहे. मंडी लोकसभा जागेबरोबरच तीन विधानसभा जागांसाठी पोटनिवडणूकही 30 ऑक्टोबर रोजी होणार आहे.

चीनच्या प्रत्येक हालचालीवर
सातत्याने लक्ष : मुकुंद नरवणे

लडाखमध्ये भारत आणि चीन यांच्यात दीर्घकाळापासून सुरु असलेला वाद लवकरच संपण्याची आशा सैन्यप्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांनी केली आहे. ते म्हणाले की, या महिन्यात दोन्ही देश यावर दीर्घकालीन तोडगा काढू शकतात. लेह इथं एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं, त्याला सैन्यप्रमुखांनी हजेरी लावली. यावेळी ते म्हणाले की, गेल्या 6 महिन्यांपासून भारत-चीन सीमेवरची परिस्थिती अगदी सामान्य आहे. ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात दोन्ही देशांमधील चर्चेची 13 वी फेरी होऊ शकते, या बैठकीत डेडलॉक संपवण्याबाबत चर्चा होईल.

SD Social Media
9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.