राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी होत आहे. त्यामुळे राज्य सरकारने अनलॉकच्या गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. त्यानुसार औरंगाबाद जिल्ह्यात लवकरच शाळा सुरु केल्या जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. औरंगाबादेत शाळा सुरु करण्याचे नियोजन करा, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.
राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता गेल्या वर्षभरापासून ऑनलाईन शिक्षण दिलं जात आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी वर्षभरापासून प्रत्यक्ष शाळांचे वर्ग भरलेले नाहीत. मात्र आता कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आल्यानंतर औरंगाबाद जिल्ह्यात पुन्हा शाळा सुरू होण्याची शक्यता आहे.
नुकतंच औरंगाबादेत शाळा सुरू करण्याचे नियोजन करा, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे. त्यानुसार प्रत्येक शाळेत शाळा नियोजन समितीची बैठक घ्या, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. तसेच शाळा निर्जंतुकीकरण कारण्यासोबत हात धुणे, सॅनिटायझर वापरण्याचे नियोजन करण्याच्या सूचना प्रशासनाने आदेश दिल्या जात आहे. त्यामुळे औरंगाबाद शहर जिल्ह्यातील शाळा सुरु होण्याची शक्यता आहे.