रेमडेसिवर औषधाची साठेबाजी रोखण्यासाठी नियंत्रण कक्ष स्थापन

कोविड-19 च्या उपचारासाठी लागणाऱ्या रेमडेसिविर (Remdesivir) औषधीची साठेबाजी रोखणे तसेच योग्यप्रकारे नियोजन करण्यासाठी अनिलकुमार माणिकराव, औषध निरीक्षक, जळगाव यांच्या नियंत्रणाखाली सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, जळगाव यांच्या कार्यालयात 12 एप्रिल, 2021 पासून नियंत्रण कक्ष (दुरध्वनी क्र. 0257-2217476 व ईमेल covid१९remd@gmail.com) स्थापन करण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी निर्गमित केले आहे. या कक्षात 24X7 अधिकारी, कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. कोविड-19 च्या उपचारासाठी लागणाऱ्या औषधींची साठेबाजी रोखणे तसेच योग्यप्रकारे नियोजन करण्यासाठी सुनिल सुर्यवंशी, जिल्हा पुरवठा अधिकारी यांची सनियंत्रण अधिकारी म्हणून तसेच त्यांना सहाय्य करण्यासाठी प्रशांत कुलकर्णी, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

         खाजगी मेडीकल, खाजगी रुग्णालय यांच्यामार्फेत कोविड-19 च्या उपचारासाठी आवश्यक Remdesivir, Tocilizumab, Itolizumab या औषधींच्या वापरावर व या औषधींची साठेबाजी रोखणे तसेच योग्यप्रकारे नियोजन करुन सदर औषध उपलब्ध होत नसल्याबाबत प्राप्त होणाऱ्या तक्रारीच्या अनुषंगाने खाजगी मेडीकल, होलसेल डिलर्स यांच्यामार्फत Remdesivir, Tocilizumab, Itolizumab औषधीच्या खरेदी व वितरण यांच्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. तसेच वाढत्या कोविड संक्रमित रुग्णांच्या संख्येमुळे Remdesivir, औषधीच्या मागणीमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. यामुळे Remdesivir औषधे उपलब्ध होत नसल्याबाबत मोठ्या प्रमाणात नागरीकांच्या तक्रारी प्राप्त होत असल्याने कोविड-19 च्या उपचारासाठी लागणाऱ्या रेमडेसिविर (Remdesivir) उपलब्धतेबाबत नागरीकांना माहिती होण्यासाठी नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

अधिकाऱ्यांची नियुक्ती

या कक्षात 24X7 खालीलप्रमाणे अधिकारी, कर्मचारी यांची पुढील आदेश होईपावेतो नियुक्ती करण्यात आली आहे. श्री. राम एम भरकडे, अन्न सुरक्षा अधिकारी, अन्न प्रशासन, जळगाव- 8149347273, श्री. प्रविण भगाजी धोंडकर, वरिष्ठ लिपीक, अन्न प्रशासन जळगाव-9011997847, श्री. मकरंद वि झाल्टे, लिपीक, वैधमापन शास्त्र, जळगाव- 8329584922, श्री. सी. डी. पालीवाल, सहाय्यक नियंत्रक, वैधमापन शास्त्र जळगाव-8329584922 हे सकाळी 7 ते दुपारी 3 वाजेपर्यंत, श्री. किशोर आत्माराम साळुंके, अन्न सुरक्षा अधिकारी, अन्न प्रशासन, जळगाव-7977727780/8149271727, श्री. मिलिंद एकनाथ साळी, वरिष्ठ लिपीक, अन्न प्रशासन, जळगाव-9326218588/8275495433, श्री. अ. वि. पाटील, निरीक्षक, वैधमापन शास्त्र, जळगाव, सु. रा. खैरनार, निरीक्षक, वैधमापन शास्त्र, जळगाव हे दुपारी 3 ते रात्री 11 वाजेपर्यंत तर संजय भिका सोनवणे, वरिष्ठ लिपीक, कार्यकारी अभियंता, जळगाव मध्यम प्रकल्प विभाग क्र. 2, जळगाव- 9452563637, श्री. मनोहर गुलाब ठाकूर, वरिष्ठ लिपीक, कार्यकारी अभियंता, जळगाव मध्यम प्रकल्प विभाग क्र. 2, जळगाव-8265056837, राजेंद्र व्यवहारे, क्षेत्र सहाय्यक, वैध मापन शास्त्र, जळगाव, श्री. मो. दा. बडगुजर, क्षेत्र सहाय्यक, वैध मापन शास्त्र, जळगाव हे रात्री 11 ते सकाळी 7 वाजेपर्यंत उपस्थित राहणार आहेत. सनियंत्रण अधिकारी यांना सहाय्य कारणेकामी श्री. प्रशांत कुळकणी, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी, जळगाव तसेच श्री अनिलकुमार माणिकराव, औषध निरीक्षक, अन्न व औषध प्रशासन, जळगाव यांनी दिलेल्या निर्देशानुसार वेळोवेळी सोपविलेले कामकाज करावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.