राज्यात गुढीपाडव्याचा सण सर्वत्र कोरोनाच्या सावटाखाली साजरा होत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरोग्याची गुढी उभारण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. करोनाच्या संसर्गावर मात करण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांची च्या संदर्भाची माहिती देण्यासाठी आणि चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आज ऑनलाईन बैठक बोलावली आहे. बैठकीमध्ये राज्यातील विविध अधिकारी आणि पदाधिकारी सहभागी झाले आहेत. बैठकीला संबोधित करताना सर्वप्रथम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना विषाणू वर मात हीच आरोग्याची गुढी असे आवाहन केले आहे.
गुढीपाडव्याच्या निमित्ताने महाराष्ट्रातील जनतेला शुभेच्छा देताना मुख्यमंत्री म्हणाले, कोरोना विषाणूवर मात हीच आरोग्याची गुढी! गर्दी टाळणे, मास्कचा वापर व वारंवार हात धुणे ही त्रिसुत्री पाळा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी गुढी पाडवा आणि नववर्षाच्या शुभेच्छा देताना केले आहे. हे नववर्ष आपल्या सर्वांसाठी आरोग्य, सुख-समृद्धी, भरभराट घेऊन येवो. अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.