श्रद्धा वालकरच्या हत्येचा तपास करणाऱ्या दिल्ली पोलिसांच्या पथकाने गुरुग्राममधील एका खासगी कंपनीच्या कार्यालयाला भेट दिली. येथे आरोपी आफताब पूनावाला काम करत असे, असे अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सांगितले. येथे झडती घेतल्यानंतर कार्यालयाच्या परिसरातील झुडपांतून जप्त केलेल्या वस्तू पोलीस एका प्लॅस्टिक पिशवीतून घेऊन जाताना दिसले. मात्र त्याचा तपशील पोलिसांनी सांगितला नाही. आफताब आणि श्रद्धा मुंबईहून दिल्लीत स्थलांतरित झाल्यानंतर आरोपी खासगी कंपनीत काम करत असे, त्यांनी सांगितले. पुढील काही दिवसांत पूनावालाला हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि इतर ठिकाणी तपासासाठी नेले जाईल.