‘मला तुमचं ऐकायचं आहे’, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली मराठी कलाकारांची खास बैठक

  “मला तुमचं ऐकायचं आहे” असं म्हणत काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठी नाटक,मालिका, आणि चित्रपट या तिन्ही क्षेत्रातल्या कलाकारांशी संवाद साधला. यावेळी मराठी सिनेसृष्टीतील अनेक नवे-जुने दिग्गज कलाकार उपस्थित होते. या भेटीदरम्यान अनेक महत्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. सोबतच मुख्यमंत्र्यांनी अनेक महत्वाच्या बाबींवर बारकाईने लक्ष देण्याचं आणि मराठी सिनेसृष्टीला गतवैभव प्राप्त करुन देण्याचं आश्वासनही दिलं आहे. प्रसाद ओकने याबाबत एक पोस्टही शेअर केली आहे. पाहूया या बैठकीत नेमकं काय-काय घडलं.

बैठकीत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा आणि ठराव-

राज्याचे मुख्यमंत्री आणि सिनेसृष्टीतील कलाकार यांच्यामध्ये झालेल्या या बैठकीत मराठी सिनेसृष्टीशी निगडीत अनेक विषयांवर प्रकाशझोत टाकण्यात आला. यावेळी अनेक विषयांवर सखोल चर्चा करून त्याबाबतीत निर्णय घेण्यात आले आहेत. या बैठकीत मराठी चित्रपटांना जीएसटीतून सूट देण्याचा महत्वाचा निर्णय घेण्यात आला. इतकंच नव्हे तर ज्येष्ठ मराठी कलाकारांना मानधन योजनासुद्धा सुरु करण्यासाठी ठोस पाऊल उचलण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे.

यावेळी दादासाहेब फाळके चित्रनगरीवरही लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे. या चित्रनगरीतील रस्ते, प्रवासी वाहतूक व्यवस्था, पायाभूत सुविधा,सुरक्षा आणि स्वछता अशा अनेक बाबी तातडीने उपलब्ध करुन देण्याच्या दिशेने पावले उचलण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. विनामूल्य वैद्यकीय सुविधा, ज्येष्ठ कलाकरांना सेटवर राबणाऱ्या तंत्रज्ञांना,वादकांना विमा संरक्षण याबाबतही लवकरच निर्णय घेण्यासाठी बैठक आयोजित करण्याचं आश्वासनही या बैठकीत देण्यात आलं आहे. दरम्यान चित्रनगरीला भेट देऊन पाहणी करण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. त्यामुळे मराठी सिनेसृष्टीत लवकरच नवे बदल दिसून येतील याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.