कुपोषणाच्या विळख्यात सापडलेल्या मेळघाटमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. कुपोषणामुळे मेळघाटमध्ये मागच्या 5 महिन्यात 110 बालकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
मेळघाटमध्ये कुपोषणामुळे मृत्यूचे प्रमाण कमी होण्याचे नाव घेत नाही. दिवसेंदिवस बालकांच्या मृत्यूचे प्रमाण वाढतच चालल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे. मागील पाच महिन्यात 110 बालकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यात शून्य ते सहा महिने या वयोगटातील 77 बालकांचा समावेश आहे. तर 33 बालक हे मृतावस्थेत जन्माला आले होते.
अमृत महोत्सव काळात एकट्या धारणी उप जिल्हा रुग्णालयात 36 पैकी 19 बालकांचा मृत्यू झाल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे. सोबतच दोन गरोदर मातांचा ही मृत्यू झाला. ही माहिती आरोग्य विभागाच्याच आकडेवारीत समोर आली आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.
कुपोषण दूर व्हावं यासाठी गेली अनेक वर्ष राज्य सरकार अनेक योजना राबवतं मात्र त्याचा काहीही परिणाम होत नाही. परिस्थिती फारशी बदलेली नाही. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.