अवघ्या 500 रुपयांमध्ये 2 अल्पवयीन मुलींना विकले, जव्हारमधील घटना

कुटुंबाचे असलेली आर्थिक परिस्थिती आणि अगतिकता याचा फायदा घेऊन जव्हारमधील धारणहट्टी येथील दोन अल्पवयीन मुलींची पाचशे रुपयांमध्ये विक्री  केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनीषा नरेश भोये आणि काळू नरेश भोये अशी या अल्पवयीन मुलींची नाव आहे. अहमदनगर जिल्ह्यातील एका मेंढपाळाकडे मनीषा 3 वर्षांपासून तर काळू एक वर्षापासून बालमजुरी करत होती. मागील काही वर्षांपासून या दोन्ही चिमुकल्या या मेंढपाळाकडे मेंढ्यांची साफसफाई, घरगुती काम, मेंढ्यांसोबत गुराखी जाण अशा विविध कामांवर राबवल्या जात होत्या.

या बदल्यात त्यांना वर्षाकाठी 12 हजार रुपये आणि एक मेंढी देण्याचं आश्वासन मेंढपाळाकडून देण्यात आलं होतं मात्र प्रत्यक्षात वर्षाला अवघे पाचशे रुपये दिले जात असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर या प्रकरणाची श्रमजीवी संघटनेने पुढाकार घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.