IRCTC प्रवाशांना स्वस्तात गुजरातला नेत आहे. हे टूर पॅकेज लवकरच सुरू होणार आहे. जर तुम्हाला गुजरातला जायचं असेल तर तुम्ही IRCTC च्या या टूर पॅकेजचा लाभ घेऊ शकता. या टूर पॅकेजची सुरुवात दिल्लीपासून होणार आहे.या टूर पॅकेजमध्ये प्रवाशांच्या जेवणाची आणि निवासाची व्यवस्था आयआरसीटीसीकडून केली जाणार आहे. प्रवाशांना एसी हॉटेल्समध्ये राहण्याची व्यवस्था केली जाईल. प्रवाशांना बसेसमधून प्रेक्षणीय स्थळी नेले जाईल आणि गाइडची व्यवस्था केली जाईल. यासोबतच या टूर पॅकेजमध्ये ट्रॅव्हल इन्शुरन्सची सुविधाही देण्यात आली आहे.
IRCTC चं हे टूर पॅकेज 28 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. गर्वी गुजरात असे या टूर पॅकेजचे नाव आहे. ही ट्रेन 28 फेब्रुवारी रोजी दिल्ली सफदरजंग रेल्वे स्टेशनवरून निघेल आणि या टूर पॅकेजद्वारे प्रवाशांना 8 दिवस गुजरातला नेले जाईल.
ही ट्रेन फुलेरा, गुरुग्राम, रेवाडी, रिंगास आणि अजमेर येथे थांबेल जिथे प्रवासी या ट्रेनमध्ये चढू शकतात. या टूर पॅकेजच्या माध्यमातून तुम्हाला केवडिया येथील स्टॅच्यू ऑफ युनिटी पाहता येणार आहे. या टुरिस्ट ट्रेनमध्ये चार फर्स्ट एसी डब्यांचा समावेश करण्यात आलाय.या टूर पॅकेजमध्ये IRCTC ने EMI मध्ये पेमेंट करण्याचा पर्याय देखील दिलाय. ज्यासाठी पेमेंट गेटवेसोबत करार करण्यात आलाय. या टूर पॅकेजमध्ये प्रवासी चंपानेर, सोमनाथ, स्टॅच्यू ऑफ युनिटी, द्वारका, अहमदाबाद, नागेश्वर, बेट द्वारका, मोढेरा आणि पाटणला भेट देणार आहेत. नागेश्वर ज्योतिर्लिंग, सोमनाथ ज्योतिर्लिंग, द्वारकाधीश मंदिर आणि बीट द्वारकालाही भेट देतील.या टूर पॅकेजच्या एसी 2 टियरमध्ये प्रवास करण्यासाठी प्रवाशांना प्रति व्यक्ती 52250 रुपये भाडे द्यावे लागेल. एसी 1 (केबिन) साठी तिकीट बुक करताना, प्रति व्यक्ती 67140 रुपये भाडे द्यावे लागेल. AC 1 (कूप) साठी प्रति व्यक्ती 77 हजार 400 रुपये भाडे द्यावे लागेल. या टूर पॅकेजची सुरुवात दिल्लीपासून होणार आहे.