अभिनेत्री समांथा रुथ प्रभू हिने दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये आपली छाप निर्माण करताना बॉलिवूडमध्येही स्वतःचा दबदबा निर्माण केला आहे. तिने हिंदी चित्रपटांमध्ये जरी काम केलं नसलं तरी बॉलिवूड चित्रपट पाहणारे असंख्य प्रेक्षक तिचे चाहते आहेत. तिचे नाव आज भारतातल्या आघाडीच्या अभिनेत्रींच्या यादीत घेतले जाते. अनेक आघाडीच्या अभिनेत्रींना मागे टाकत तिने स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. सध्या ती तिच्या आगामी चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. या चित्रपटातील तिचा दागिने घातलेला एक फोटो सध्या खूप चर्चेत आला आहे.
समांथा लवकरच ‘शकुंतलम’ या चित्रपटात झळकणार आहे. १४ एप्रिल रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार असून सध्या ती या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये खूप बिझी आहे. या चित्रपटाच्या घोषणेपासूनच सर्वांचं लक्ष या बिग बजेट चित्रपटाकडे लागलं होतं. या चित्रपटाच्या टिझर आणि ट्रेलरला देखील प्रेक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला. या चित्रपटातील समांथाच्या लूकने सर्वांनाच भुरळ घातली. या चित्रपटात तिने घातलेल्या दागिन्यांची सध्या जोरदार चर्चा आहे.
या चित्रपटातील समांथाचा लूक सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. यामध्ये तिने बिंदीपासून ते पैंजणापर्यंत दागिने परिधान केलेले दिसत आहेत. हे तिचे सर्व दागिने खरे आहेत. सोनं आणि हिऱ्यांनी बनवल्या गेलेल्या या दागिन्यांची किंमत तब्बल १४ कोटी आहे. या चित्रपटातील तिचा लूक हा प्रसिद्ध फॅशन डिझायनर नीता लुल्ला यांनी डिझाइन केला आहे.