ट्रेनच्या एसी कोचला येणार अच्छे दिन! ‘या’ गोष्टीत होणार सुधारणा

तुम्ही लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी भारतीय रेल्वेने जर प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. रेल्वेतून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. रस्ते मार्गापेक्षा भारतातील रेल्वे प्रवास तुलनेने सर्वात सुरक्षित मानला जातो. यामुळे प्रवाशांच्या सोयासाठी भारतीय रेल्वे अनेक महत्वाचे निर्णय घेत असते. अशात ट्रेनच्या एसी कोचबाब एक मोठा निर्णय घेतला आहे. प्रवाशांना आता ट्रेनमध्ये अस्वच्छ चादर आणि ब्लँकेटचा त्रास सहन करावा लागणार नाही. यासाठी भारतीय रेल्वेने नियमात बदल केला आहे.

रेल्वेच्या एसी कोचमधील घाणेरड्या चादरी आणि ब्लँकेट आणि केटरिंगमधील निष्काळजीपणा आता खपवून घेतला जाणार नाही. त्यासाठी रेल्वेने टेंडर बदलण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र हे नवे नियम केव्हा लागू केले जातील जाणून घेऊ…

भारतीय रेल्वेच्या नव्या नियमामुळे ट्रेनच्या एसी कोचला अच्छे दिन येणार आहे. एसी कोचमध्ये आता स्वच्छ पडदे लावण्यात येणार आहेत. रेल्वेच्या नव्या नियमानुसार, टेंडर घेण्याऱ्या व्यक्तीला ट्रेनमधील चादर आणि ब्लँकेट धुण्यासाठी ६ महिन्यांपेक्षा जास्त काळ दिला जाणार नाही. यासाठी रेल्वे बोर्डाने आयआरसीटीसी आणि रेल्वे झोनलसाठी सूचना जारी केल्या आहेत. यासह चादर, ब्लॅकेट धुण्याचे टेंडर डिव्हिजननुसार न देता नव्या पॉलिसीअंतर्गत रेल्वे बोर्डमार्फत होणार आहे. यामुळे त्याची देखरेख करणे अधिक सोपे होणार असून, डिव्हिजननुसार त्याचे निरीक्षण केले जाणार आहे.

सध्या ट्रेनची साफसफाई, पॅन्ट्री कार सर्विसेज, चादर आणि ब्लँकेट धुण्याचे कंत्राट ३ ते ५ वर्षांसाठी आहे. ही मुदत संपल्यानंतर पुन्हा मुदतवाढ देत टेंडर त्याच व्यक्तीला दिले जाते. मात्र नव्या नियमानुसार आता असे होणार नाही. IRCTC च्या वतीने रेल्वे बोर्डाने सर्व झोनला पत्र पाठवले आहे.

यानुसार आता रेल्वेच्या साफसफाईचे टेंडर केवळ ६ महिन्यांसाठीच देण्यात येणार आहे. त्याचवेळी, स्वच्छता आणि तागाचे कपडे धुण्यासाठी निविदांचे केंद्रीकरण करण्याचा विचार केला जात आहे. यासंदर्भात रेल्वे बोर्डात विचार सुरू आहे.

ट्रेनमधून दररोज प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांच्या सोयीसाठी ‘पॅसेंजर सर्व्हिस कॉन्ट्रॅक्ट पॉलिसी’ही आणली जात आहे. त्याची सुरुवात दिल्लीपासून होणार आहे. यासाठी २४५ गाड्या निवडण्यात आल्या आहेत. या धोरणांतर्गत अस्वच्छता, खराब अन्न आणि घाणेरड्या चादर, ब्लँकेटची समस्याही दूर केली जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.