“एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाला धोका”, अजित पवारांचा उल्लेख करत एकनाथ खडसेंचं मोठं विधान!
अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे ४० आमदार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्यामुळे महायुतीत मंत्रीमंडळ विस्ताराचा पेच निर्माण झाला आहे. आपल्या पारड्यात जास्तीत जास्त मंत्रीपदं मिळावीत, यासाठी भाजपासह शिंदे गट आणि अजित पवार गटाकडून हालचाली वाढल्या आहेत. अशा राजकीय हालचाली सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी मोठं विधान केलं आहे. आगामी काळात एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्री पदाला धोका आहे, असं विधान खडसे यांनी केलं.खरं तर, अजित पवार गट सत्तेत सामील झाल्यानंतर काँग्रेसमधील काही आमदारही फुटू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. यावर प्रतिक्रिया देताना एकनाथ खडसे म्हणाले, “कर्नाटक विधानसभा निवडणुका जिंकल्यामुळे काँग्रेसमधून कोणताही आमदार तिकडे जाईल, अशी स्थिती राज्याता नाही. याउलट कर्नाटकमधील विजयामुळे काँग्रेसच्या आमदारांमध्ये उत्साह वाढला आहे. महाराष्ट्रात विरोधी पक्षाची पोकळी काँग्रेस भरू शकते, अशा विश्वास त्यांना आहे. त्यामुळे काही महिन्यांसाठी किंवा काही दिवसांसाठी काँग्रेसचे आमदार तिकडे जातील, असं मला वाटत नाही.”
कोळसा घोटाळाप्रकरणी विजय दर्डांसह ‘हे’ सर्व आरोपी दोषी, विशेष न्यायालयाचा निर्णय
दिल्लीतील विशेष न्यायालयाने गुरुवारी (१३ जुलै) कोळसा घोटाळाप्रकरणी मोठा निर्णय दिला आहे. दिल्ली न्यायालयाने छत्तीसगडमधील कोळसा खाण वाटपातील प्रकरणात माजी खासदार विजय दर्डांसह सर्व आरोपींना दोषी ठरवलं.यात राज्यसभेचे माजी खासदार विजय दर्डा, त्यांचा मुलगा देवेंद्र दर्डा, कोळसा विभागाचे माजी सचिव एच. सी. गुप्ता, के. एस. क्रोफा आणि के. सी. सामरिया, जेएलडी यवतमाळ एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड आणि त्यांचे संचालक मनोज कुमार जयस्वाल इत्यादींचा समावेश आहे.
अर्थमंत्रीपदाबाबत शिंदे गटातील मंत्र्याचं मोठं विधान
अजित पवारांसह ९ मंत्र्यांचा शपथविधी होऊन बारा दिवस उलटले आहेत. अद्यापही अजित पवारांच्या गटातील मंत्र्यांना खातेवाटप झालं नाही. भाजपा आणि शिंदे गटातील मंत्र्यांनी महत्वाची खाती अजित पवारांच्या गटातील मंत्र्यांना देण्यास विरोध केल्याचं सांगितलं जात आहे. यावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाष्य करत स्पष्टीकरण दिलं आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.“सरकारमध्ये तिसरा भिडू आला आहे. त्यामुळे काही मंत्र्यांचा शपथविधी राहिला असून खातेवाटपात गडबड होणार आहे. म्हणून खातेवाटपास थोडा विलंब होत आहे. पण, याचा अर्थ खातेवाटपावरून कोणी नाराज नाही आहे. अर्थमंत्रीपदाबाबत वरिष्ठांनी घेतलेला निर्णय आम्हा सर्वांना मान्य असेल,” असं मोठं विधान गुलाबराव पाटील यांनी केलं आहे.
सोनिया गांधी पुन्हा सक्रिय? बंगळुरू येथे होणाऱ्या विरोधकांच्या बैठकीला हजेरी लावणार
काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सक्रिय राजकारणातून बाजूला होण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, १७-१८ जुलै रोजी बंगळुरू येथे होणाऱ्या विरोधकांच्या दुसऱ्या बैठकीला उपस्थित राहण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. सोनिया गांधी यांच्या उपस्थितीमुळे विरोधकांचे ऐक्य करण्यासाठी काँग्रेस गंभीर असल्याचा संदेश दिला येईल. तसेच विरोधकांच्या गटाला औपचारिक स्वरूप देण्याची प्रक्रिया सुरू करण्यासाठी सोनिया गांधी यांची उपस्थिती अतिशय महत्त्वाची ठरणार आहे.
कोविडच्या लसीचे पूर्ण डोस घेतलेल्या महिलांच्या बाळांना गंभीर हृदयविकार
लाइटहाऊस जर्नलिझमला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक लेख आणि त्याच्या लिंकसह एक पोस्ट शेअर होत असल्याचे आढळले. पोस्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) कबूल केले आहे की, कोविड १९ ची लस घेतलेल्या हजारो माता गंभीर हृदयविकार असलेल्या बाळांना जन्म देत आहेत. यामुळे अनेक गर्भवती महिलांमध्ये भीती दिसून येत आहे. या प्रकरणाच्या तपासात या दाव्यांचा सविस्तर खुलासा झाला आहे.
भारतात आहे आशियातील सर्वांत जास्त सुशिक्षित गाव; ८० टक्के लोक चांगल्या पदांवर करतात काम
शिक्षण हे माणसाच्या मूलभूत गरजांपैकी एक आहे. देश साक्षर अन् सुशिक्षित व्हावा यासाठी आपल्या देशात कित्येक वर्षांपासून शिक्षणासंदर्भात अनेक मोहिमा राबवल्या जात आहेत. सध्या एका सर्वेक्षणातून एक थक्क करणारी बाब समोर आली आहे. ती म्हणजे आशियातील सर्वांत जास्त सुशिक्षित गाव हे भारतात आहे. विश्वास बसणार नाही; पण हे खरं आहे. उत्तर प्रदेशच्या अलीगढ जिल्ह्यातील धोर्रा माफी नावाचं हे गाव आहे.धोर्रा माफी या गावात जवळपास १० ते ११ हजार लोक राहतात. विशेष म्हणजे या गावातील ९० टक्के लोक सुशिक्षित आहेत. २०२२ मध्ये धोर्रा माफी या गावाने ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये आपले नाव दिले होते. या गावाचा साक्षरता दर ७५ टक्क्यांहून अधिक होता; जो एक रेकॉर्ड मानला जातो. याशिवाय हे गाव ‘गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड’ च्या सर्वेक्षणासाठी निवडले गेले आहे.
चांद्रयान-३ चे थेट प्रक्षेपण नागरिकांना पाहण्यासाठी इस्रोकडून खास व्यवस्था
भारताच्या चांद्रयान-३ या मोहिमेकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील अंतराळ केंद्रातून १४ जुलै रोजी दुपारी २.३५ वाजता ‘चांद्रयान-३’ अंतराळात प्रक्षेपित केले जाईल. ६ सप्टेंबर २०१९ च्या पहाटे चंद्रावर लँडर व रोव्हर आदळल्यानंतर चांद्रयान-२ मोहीम अंशत: अयशस्वी झाली होती. त्यामुळे भारताच्या चांद्रयान-३ मोहिमेला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे.चांद्रयान-३ च्या लँडरने २३ किंवा २४ ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग करणे अपेक्षित आहे. ६१५ कोटी रुपये खर्चून तयार करण्यात आलेल्या चांद्रयान -३ या मोहिमेचे उद्दिष्ट हे रोव्हरला चंद्राच्या कक्षेमध्ये पोचवणे व चंद्राच्या पृष्ठभागावर वैज्ञानिक प्रयोग करणे हे आहे.राष्ट्रीय अंतराळ संस्थेने नागरिकांना चांद्रयान-३ चे प्रक्षेपण पाहण्यासाठी आमंत्रित केले आहे. नागरिकांना हे थेट प्रक्षेपण https://lvg.shar.gov.in/VSCREGISTRATION या लिंकवर नोंदणी करून SDSC-SHAR, श्रीहरिकोटा येथील लॉन्च व्ह्यू गॅलरीतून पाहता येणार आहे. ISRO ने ट्विट करत नागरिकांना हे प्रक्षेपण पाहण्यासाठी आमंत्रित केले आहे.
तिसऱ्या टी-२० सामन्यात बांगलादेशचा भारतावर ३ विकेट्सने विजय
बांगलादेश आणि भारत यांच्यात खेळल्या गेलेल्या तिसऱ्या टी-२० सामन्यात यजमान बांगलादेश संघाने ४ गडी राखून विजय मिळवला. या विजयाने त्यानी आपली लाज राखली आहे. कारण टीम इंडियाने सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकून मालिका आपल्या ताब्यात जिंकली होती.टीम इंडियाने तिसरा सामनाही जिंकला असता, तर बांगलादेशने घरच्या मैदानावर क्लीन स्वीप स्वीकारावा लागला असता. मात्र शमीमा सुलतानची उत्कृष्ट फलंदाजी आणि रुबिया खानच्या गोलंदाजीच्या जोरावर बांगलादेशने तिसरा टी-२० सामना जिंकला.
गुरू अर्चना पालेकर यांचा ‘मदर इंडिया’ पुरस्काराने सन्मान, ४१ वर्षांपासून भरतनाट्यम क्षेत्रात कार्यरत
‘युवा व्हिजन’ या संस्थेतर्फे ‘नृत्यकला निकेतन’च्या संचालिका गुरू अर्चना पालेकर यांना ‘मदर इंडिया’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गेल्या ४१ वर्षांपासून त्या भरतनाट्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांचे या क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान तसेच भरतनाट्यम या शास्त्रीय नृत्याच्या प्रचार आणि प्रसाराबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.या कार्यक्रमात नृत्यकला निकेतन’च्या ३६ विद्यार्थिनींनी अनोख्या पद्धतीने गुरू अर्चना पालेकर यांना अनोखी गुरू दक्षिणा वाहिली. यावेळी या विद्यार्थिनींनी महाराष्ट्र गीतावर ३. ३६ सेकंदाचे भारतनाट्यम सादरीकरण केले. याची नोंद ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे. त्याचे सन्मानचिन्ह आणि नियुक्ती पत्र गुरू अर्चना पालेकर यांना देण्यात आले आहे.
SD Social Media
9850 60 3590