जळगाव महापालिकेत घनकचरा प्रकल्पावरून भाजप शिवसेनेत खडाजंगी

जळगाव शहरातील घनकचरा प्रकल्पाच्या वाढीव निधीबाबत गेल्या महासभेत भाजपच्या सर्व सदस्यांनी विरोध केला. त्यानंतर सुध्दा महासभेत एकाच सदस्याचा विरोध नोंदवत सत्ताधाऱ्यांनी हा ठराव मंजूर केला. इतिवृत्तात भाजप सदस्यांचा विरोध नोंदवून इतिवृत्त मंजूर करावे अशी मागणी भाजपच्या महिला सदस्यांनी केली. त्याला शिवसेना सत्ताधारी गटाने विरोध केला. मात्र, ज्यावेळी महिला सदस्य संतप्त झाल्या. तसेच त्यांनी प्रत्येक मुद्दा खोडून काढत सत्ताधारी गटाची बोलती बंद केली. अखेर सत्ताधाऱ्यांनी नमते घेत भाजप सदस्यांचा इतिवृत्तात विरोध नोंदविला. महाराष्ट्रात सध्या भाजप आणि शिवसेना यांच्यात संघर्ष सुरू आहे. त्याचे पडसाद राज्यात देखील उमटायला लागले आहेत.

सभेच्या सुरूवातील मागील सभेचे इतिवृत्त मंजूर करण्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. त्यावेळी भाजपच्या ॲड. शुचिता हाडा म्हणाल्या, की घनकचरा प्रकल्पाच्या प्रस्तावास भाजपच्या सर्व सदस्यांचा विरोध होता. मात्र, केवळ माझ्या एकटीचा विरोध नोंदवून इतर सदस्यांचा ठरावाच्या बाजूने मते घेण्यात आली. इतिवृत्तात ही चुकीची नोंद करण्यात आली आहे. त्याला आमचा पूर्ण विरोध आहे. आमचा विरोध नोंदवून इतिवृत्त मंजूर करावे अशी मागणी शुचिता हाडा केली.

सत्ताधारी शिवसेनेचे गटनेते नितीन लढ्ढा यांनी मात्र त्याला पूर्णपणे विरोध दर्शविला. ते म्हणाले की, ॲड. शुचिता हाडा यांनी विरोध केला म्हणून त्यांचा विरोध नोंदवून घेण्यात आला. इतरांनी त्याबाबत काही बोलले नाही. पक्षाचा विरोध नोंदवायचा, तर किमान चार जणांचा विरोध आवश्‍यक आहे. त्यामुळे इतिवृत्तात त्यांचा विरोध नोंदविला जावू शकत नाही.

सत्ताधारी इतिवृत्तात विरोध नोंदविण्यास नकार देवून महासभा पुढे नेण्याचा प्रयत्न केला. हे भाजपाच्या सदस्याच्या लक्षात येताच भाजपच्या सर्वच नगरसेविका संतप्त झाल्या. त्यावेळी सर्व सदस्यांनी आपल्या जागेवर उठून इतिवृत्तात आमचा विरोध नोंदवून घ्या अशी मागणी केली. अन्यथा आम्ही पुढे सभा चालू देणारा नाही, असा इशाराच त्यांनी दिला. यानंतर मात्र सत्ताधारी नरमले व त्यांनी इतिवृत्तात भाजपच्या सर्व सदस्यांचा विरोध नोंदवून घेतला. त्यानंतर पुढील सभा सुरू झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.