आयकर विभागाकडून चालू आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये 20 मार्चपर्यंत 2.26 कोटी करदात्यांना 1.93 कोटी रुपयांचा कर परतावा देण्यात आला आहे. इनकम टॅक्स विभागाने दिलेल्या माहितीनुसार यापैकी 38,447.27 कोटी रुपयांचे 1.85 कोटी रिफंड हे मूल्यांकन वर्ष 2021-22 संपणाऱ्या आर्थिक वर्षासाठी आहेत. याबाबत गुरुवारी आयकर विभागाकडून एक ट्विट देखील करण्यात आले आहे.
ज्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड ‘सीबीडीटी’ ने एक एप्रिल 2021 ते 20 मार्च 2022 या कालावधीत 2.26 कोटी करदात्यांना 1,93,720 कोटी रुपयांचा कर परतावा दिला आहे. यामध्ये 70,977 कोटी रुपयांच्या व्यक्तीगत कर परतावा तर 1,22,744 कोटी रुपये कॉरपोरेट कर परताव्याचा समावेश आहे. जर तुम्हाला तुमचा इनकम टॅक्स परतावा आला आहे की नाही हे चेक करायचे असेल तर तुम्ही घरबसल्या देखील चेक करू शकता. त्यासाठी अत्यंत सोपी अशी पद्धत आहे. आज आपण आयकर परतावा जमा झाला आहे की नाही? हे कसे चेक करायचे याबाबत जाणून घेऊयात.
इनकम टॅक्स विभागाची वेबसाइट www.incometax.gov.in वर जा. तिथे तुमचा यूजर आयडी आयडी आणि पासवर्ड टाकून खाते लॉगइन करा. त्यानंतर ई-फाइन या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला तिथे इनकम टॅक्स रिटर्न्सचा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा. त्यानंतर व्ह्यू फाइल्ड रिरिटर्न्सचा ऑपशन निवडा. तिथे तुम्ही तुमचे आयटीआर स्टेटस चेक करू शकता. तिथे तुम्हाला तुम्ही किती टॅक्स भरला आहे? तुम्हाला आयकर परतावा कधी मिळणार आहे, किती मिळणार आहे अशा सर्व गोष्टींची माहिती मिळते.
एनएसडीएलच्या वेबसाईटवर जाऊन देखील तुमच्या आयकर परताव्याचे स्टेटस चेक करू शकता. त्यासाठी सर्वात प्रथम https://tin.tin.nsdl.com/oltas/refundstatuslogin.html या वेबसाईटला भेट द्या. त्यानंतर तुम्ही तिथे तुमच्या पॅन कार्डची डिटेल सबमिट करा. माहिती भरल्यानंतर तुम्हाला तुमची आयकर परताव्याबाबतची माहिती मिळेल.