सुपरस्टार रजनीकांत यांचा आज 71 वा वाढदिवस आहे. रजनीकांत यांची वेगळी ओळख करुन देण्याची गरज नाही. त्यांनी एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले आहेत. आजही त्यांचे काम इतरांना प्रेरीत करते. सर्वाधिक कमाई करणाऱ्या स्टार्सच्या यादीत त्याचा समावेश आहे. करोडोंमध्ये फी घेणाऱ्या रजनीकांतकडे खूप आलिशान घरे आहेत. चला तर मग जाणून घेऊयात किती आहे त्यांचे नेट वर्थ
कॅकनॉलेज या वेबसाईटच्या अहवालानुसार, रजनीकांत यांची एकूण संपत्ती 365 कोटी आहे. आपल्या संपत्ती पैकी बसाचा भाग रजनीकांत दान करतात. रजनीकांत यांची अजून एक खासीयत आहे ती म्हणजे जर त्यांचा कोणताही चित्रपट फ्लॉप झाला तर तो त्याची फी निर्मात्याला परत करतात. वेबसाइटनुसार, रजनीकांत एका चित्रपटासाठी 50 कोटी रुपये घेतात.
रजनीकांत यांचे चेन्नईमध्ये एक आलिशान घर आहे. हे घर त्यांनी 2002 मध्ये बांधले होते. रजनीकांत यांचे घर खूप आलिशान आहे आणि त्यांनी त्याचे घर प्राचीन वस्तूंनी घर सजवले आहे. रजनीकांत यांना गाड्यांचा छंद नाही पण त्यांच्या कड 3 गाड्या आहेत त्यामध्ये टोयोटा इनोव्हा, रेंज रोव्हर आणि बेंटले यांचा समावेश आहे.
कॅकनॉलेजच्या रिपोर्टनुसार, रजनीकांत यांची 100-120 कोटी रुपयांची गुंतवणूक आहे. रजनीकांत यांनी 1975 मध्ये तमिळ चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. यानंतर त्यांनी अनेक तामिळ, तेलुगू आणि कन्नड चित्रपटांमध्ये काम केले. यानंतर 1982 मध्ये रजनीकांत यांनी अंधा कानून या चित्रपटातून बॉलिवूड इंडस्ट्रीत पाऊल ठेवले. या चित्रपटात रजनीकांतसोबत हेमा मालिनी आणि रीना रॉय यांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या.
दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित
काही दिवसांपूर्वी रजनीकांत यांना इंडस्ट्रीतील त्यांच्या उत्कृष्ट कामासाठी दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.