भारतात आत्मघातकी हल्लाचा मोठा कट, रशियात पकडला IS चा सुसाईड बॉम्बर
ऐन सणासुदीत देशात हाय अलर्ट देण्यात आला आहे. भारतात आताच्या घडीला अनेक घटना घडत आहेत. जम्मू काश्मीरमध्ये मोठा घातपाताचा कट उधळला. तर दुसरीकडे महाराष्ट्रात हरिहरेश्वर इथे संशयित बोट सापडली असून त्यामध्ये शस्त्र सापडली आहेत. आणखी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. ISIS च्या निशाण्यावर पुन्हा एकदा भारत असल्याची माहिती मिळाली आहे.
भारतात सुसाईड अटॅक घडवून आणण्याचा ISIS चा प्लॅन असल्याची माहिती मिळाली आहे. रशियातून भारतात येणाऱ्या एकाचा अटक केल्यानंतर त्याच्याकडून ही धक्कादायक माहिती मिळाली. हा व्यक्ती संशयास्पदरित्या रशियामार्गे भारतात घुसणार होता. त्याच वेळी त्याला भारतात येताना अटक करण्यात आली.
सुरक्षा दलाने मोठ्या घातपाताचा कट उधळला, 10 किलो स्फोटकं जप्त
सुरक्षा दलाने रविवारी पुलवामामध्ये इम्प्रोवाइज्ड एक्सप्लोसिव डिव्हाइसला नष्ट करता करता मोठी दुर्घटना होता होता टळली आहे. यामुळे मोठा दहशतवादी हल्ला घडू शकला असता. मात्र सुरक्षा दलाने दहशतवाद्यांचे मनसुबे आधीच हाणून पाडले. जवानांनी त्राल जिल्ह्यातील बेहगुंड भागात 10 ते 12 किलो वजनाचे आयईडी जप्त केले. याला नष्ट करण्यात जवानांना आणि पोलिसांना यश आलं आहे.
फडणवीसांच्या लाडक्या जलयुक्त शिवार योजनेचं पुनरागमन होणार; २५ हजार गावांमध्ये अंमलबजावणी
राज्यातील २५ हजार दुष्काळग्रस्त गावांमध्ये ‘जलयुक्त शिवार योजना’ महाराष्ट्र सरकार पुन्हा कार्यान्वित करण्याच्या तयारीत आहे. विशेषत: मराठवाडा आणि विदर्भातील दुष्काळग्रस्त गावातील समस्या सोडवण्यावर या योजनेचा भर असेल. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी २०१४ मध्ये सुरू केलेली ही महत्त्वाकांक्षी योजना महाविकासआघाडी सरकारने बंद केली होती. आता राज्यात शिंदे गटासोबत भाजपाने सत्ता स्थापन करताच पुन्हा ही योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. ‘इंडियन एक्सप्रेस’ने याबाबतचं वृत्त दिलं आहे.
‘जिथे महिलांचा सन्मान होणार, तिथे मी येणार’; सभेतल्या भाषण बाजीनंतर पंकजा मुंडे झळकणार नवीन भूमिकेत
झी मराठीवरील ‘उंच माझा झोका’ या पुरस्काराची सध्या सगळीकडे चर्चा आहे. विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महिलांचा, स्त्री कर्तृत्वाचा सन्मान या पुरस्कार सोहळ्याद्वारे केला जातो. बऱ्याच वर्षांच्या गॅपनंतर हा दिमाखदार सोहळा पुन्हा परतला आहे. यावर्षी देखील मला अभिमान आहे हे ब्रीद घेऊन स्त्री कर्तृत्वाचा सन्मान म्हणून उंच माझा झोका’ या नेत्रदीपक सोहळयाचे सादरीकरण होणार आहे.’उंच माझा झोका’ पुरस्काराचे यंदाचं हे आठवे वर्ष आहे. आपल्या कार्याने समाजाला सुदृढ वैचारिकरित्या समृद्ध करणाऱ्या विविध क्षेत्रातील महिलांचा यावेळी गौरव करण्यात येईल. या वर्षीच्या पुरस्काराचे खास आकर्षण म्हणजे ह्या कार्यक्रमाच्या निवेदनाची धुरा पंकजा मुंडे या सांभाळणार आहेत. नुकताच या कार्यक्रमाचा एक प्रोमो समोर आला आहे. त्यामध्ये पंकजा मुंडे निवेदकाच्या भूमिकेत दिसत आहेत. त्यांच्यासोबत प्रसिद्ध अभिनेत्री क्रांती रेडकर ही देखील सूत्रसंचालक म्हणून दिसणार आहे. पंकजा मुंडे आणि क्रांती रेडकर या दोघींची जुगलबंदी ह्या कार्यक्रमात रंगत आणेल ह्यात शंकाच नाही.
बँकांच्या तपासणीतच आढळल्या दोन हजारांच्या हजारो बनावट नोटा
२०२१-२२ या वर्षात देशभरातील बँकांच्या स्वत:च्या तपासणीत दोन हजाराच्या १३ हजारांवर बनावट नोटा सापडल्या आहेत. यापेक्षा अधिक संख्येने पोलिसांनी देशभरात विविध ठिकाणी केलेल्या कारवाईत जप्त केल्या आहेत. ही संख्या लाखोंच्या घरात आहे.केंद्र शासनाने यासंदर्भात संसदेच्या नुकत्याच झालेल्या अधिवेशनात सादर केलेल्या माहितीनुसार २०२१-२०२२ मध्ये, बँकांच्या स्वत:च्या तपासणीत दोन हजार रुपयांच्या १३,६०४ बनावट नोटा सापडल्या. मात्र, २०२१-२२ च्या तुलनेत २०१८-१९ ते २०२०-२१ या दरम्यान हे प्रमाण कमी झाल्याचा दावा सरकारने केला आहे. दुसरीकडे राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या (एनसीआरबी) तपशीलानुसार २०१८ते २०२० दरम्यान देशात पोलिसांनी विविध ठिकाणी टाकलेल्या छाप्यात सापडलेल्या बनावट नोटांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून येते. २०१८ मध्ये ५४,७७६, २०१९ मध्ये ९०,५६६ तर २०२० मध्ये २,४४,८३४ दोन हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.
न्यूयॉर्कच्या महापौरांनाही पडली अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ची भुरळ!
अल्लू अर्जुन हा सध्या भारतातला सर्वात मोठा सुपरस्टार म्हणून ओळखला जात आहे. त्याच्या ‘पुष्पा’या चित्रपटाने केवळ देशालाच नव्हे तर साऱ्या जगाला वेड लावलं आहे. ‘पुष्पा’साठी आवाज देणाऱ्या मराठमोळ्या श्रेयस तळपदेपासून अगदी ‘ऊ अंटावा’वर थिराकणाऱ्या समंथापर्यंत सगळ्याच गोष्टी प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्या. न्यू यॉर्कमध्ये एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमात भारताकडून तेलुगू अभिनेता अल्लू अर्जुनने हजेरी लावली होती. या कार्यक्रमात अल्लू न्यू यॉर्कचे मेयर म्हणजेच महापौर एरिक अॕडम्स यांना भेटला. तिथे त्यांच्यात बऱ्याच गप्पा झाल्या. इतकंच नाही तर अल्लूने त्यांना ‘पुष्पा’मधली त्याची खास स्टाईल शिकवली आणि त्यांच्यासोबत फोटोसुद्धा क्लिक केले.
मॉर्निंग वॉकला गेलेल्या वृद्धावर अस्वलाचा जीवघेणा हल्ला, प्रकृती चिंताजनक
मॉर्निंग वॉकला गेलेल्या वृद्धावर अस्वलाने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना भंडारा तालुक्यातील कोका अभयारण्यालगत ढिवरवाडा ते मांडवी दरम्यान घडली. या हल्ल्यात वृद्धाच्या डोक्यावर व पायावर खोलवर इजा झाली आहे. गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी नागपूर येथे रवाना करण्यात आले आहे. कोदू तुकाराम हिंगे (65) रा. ढिवरवाडा असे जखमी झालेल्या वृद्धाचे नाव आहे.सकाळी ते नेहमी प्रमाणे मॉर्निंग वॉकला ढिवरवाडा ते मांडवी रस्त्यावर गेले होते. यावेळी अचानक एका अस्वलाने त्यांच्यावर हल्ला केला. मात्र परिसरात कुणीच नसल्याने ते रस्त्यावर पडून होते.
नाशिक जिल्ह्यात घ्या केदारनाथचा अनुभव, अंजनेरी पर्वतरांगेत साकारलंय हुबेहुब मंदिर
वाढोली (ता. त्र्यंबकेश्वर) येथे शिवशक्ती ज्ञानपीठाच्या आश्रमात श्री स्वरुपेश्वर बाणेश्वर महादेव मंदिर हे पुणे येथील श्रुतीसागर आश्रमाच्या माध्यमातून साकारण्यात आले आहे. अंजनेरीपर्वतरांगेत हे मंदिर असून प्रतिकेदारनाथ म्हणून अलीकडे हे मंदिर प्रचलित झाले आहे. सध्या भाविकांचे हे मंदिर मुख्य आकर्षण ठरत आहे. उत्तराखंडमधील केदारनाथ मंदिराची हुबेहूब प्रतिकृती हे मंदिर आहे.
या मंदिराचे कामकाज 2014 साली पूर्ण झाले आणि तेव्हा पासूनच मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले होते. मात्र, तेव्हा मंदिराचा फार प्रचार प्रसार झाला नव्हता , अनेकांना मंदिर माहित नव्हत. पण 2022 च्या सुरुवातीलाच मंदिराचे काही फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर प्रतिकेदारनाथ मंदिर नावाने प्रचंड व्हायरल झाले. तेव्हापासून परिसरात प्रथमच असे मंदिर असल्याने शेकडो भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येतात.
500 वर्षांचा इतिहास असलेलं राजराजेश्वर मंदिर, कावड यात्रेचीही मोठी परंपरा!
श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी ग्रामदैवत राजराजेश्वरला गांधीग्राम येथील पूर्णा नदीच्या पवित्र जलाने अभिषेक घातला जातो. ही गेल्या अनेक वर्षांची परंपरा आहे. अकोलेकरांचे ग्रामदैवत असणाऱ्या राजराजेश्वराबद्दल अनेक आख्यायिका देखील आहेत. येथील शिवलिंग स्वयंभू असल्याचे मानले जाते. जवळपास 500 वर्षाचा मंदिराला इतिहास असून जागृत देवस्थान म्हणून मंदिराची ओळख आहे.श्रावणात महिन्यातील सोमवारी भाविक मोठ्या संख्येने मंदिरात दर्शनासाठी येतात. कोरोना काळात गेली दोन वर्ष मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद होते. मात्र, यावर्षी हे मंदिर भक्तांसाठी खुले झालेला आहे. येथील शिवलिंग हे स्वयंभू असल्याचे सांगितले जाते. प्राचीन ऐतिहासिक असे हे मंदिर आहे. अकोला शहरातील जुने शहर भागात असलेले हे मंदीर अकोला शहराचे ग्रामदैवत आहे. सुमारे पाचशे वर्षांचा इतिहास मंदिराला आहे.
पवार पॅटर्न दिल्लीत? ज्याद्वारे ED, CBI च्या विरोधात केजरीवाल-सिसोदियांनी ठोकला शड्डू
दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हे उत्पादन शुल्क घोटाळ्याप्रकरणी गेल्या दोन दिवसांपासून सीबीआयच्या चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. लवकरच हे प्रकरण ईडीकडे सोपवले जाईल अशीही चर्चा आहे. दरम्यान, या प्रकरणामुळे अरविंद केजरीवाल यांच्या मिस्टर क्लीनच्या प्रतिमेला धक्का पोहोचणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र, मनीष सिसोदियापासून ते अरविंद केजरीवालांपर्यंत सर्वांनी यावर माघार जाण्यास नकार दिला आहे. हे दोघेही ट्विटर आणि मैदानावर सातत्याने भाजपवर जोरदार हल्ला चढवत आहेत. मनीष सिसोदिया म्हणतात की, भाजप अरविंद केजरीवालांना घाबरत आहे आणि त्यामुळेच हे सर्व केले जात आहे.
शुभमन गिलचं शतक, टीम इंडियाचं झिम्बाब्वेला 290 धावांचं लक्ष्य
हरारेच्या तिसऱ्या वनडेत भारतीय फलंदाजांनी झिम्बाब्वेसमोर भलं मोठं आव्हान उभं केलं आहे. भारतीय संघानं पहिल्यांदा फलंदाजी करताना 50 षटकात 8 विकेट्सच्या मोबदल्यात 289 धावांचा डोंगर उभा केला. युवा फलंदाज शुभमन गिलचं शतक हे भारतीय डावाचं वैशिष्टय ठरलं. गिलनं या दौऱ्यातला आपला फॉर्म कायम ठेवताना आज शतकी खेळी साकारली. त्याचं वन डे कारकीर्दीतलं हे पहिलंवहिलं शतक ठरलं. त्यानं 97 चेंडूत 130 धावा फटकावल्या. तर ईशान किशननं 50 धावांची खेळी केली.
SD Social Media
9850 60 3590