‘टायगर 3’ चित्रपटाच्या शूटिंग आधीचं सेटचं मोठं नुकसान

अभिनेत्री कतरीना कैफ आणि अभिनेता सलमान खान स्टारर ‘टायगर 3’ चित्रपटाला मोठा फटका बसला आहे. चित्रपटासाठी सर्वचं टीमने प्रचंड मेहनत घेतली होती. पण टीमची ही मेहनत व्यर्थ ठरली आहे. ‘टायगर 3’ चित्रपटाच्या शूटिंग आधीचं सेटचं मोठं नुकसान झालं आहे. ज्यामुळे निर्मात्यांना देखील मोठा तोटा झाला आहे. लॉकडाऊन पूर्वी चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी सेट उभारण्यात आला होता. पण कोरोना व्हायरसचा वाढता थैमान पाहाता चित्रीकरण बंद करण्यात आलं.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे चित्रपटाचं मोठं नुकसान झालं आहे. ईटाइम्सने दिलेल्या माहितीनुसार ‘टायगर 3’ चित्रपटाचं सेट दुसऱ्या ठिकाणी उभारण्यात आला. दुसऱ्यांदा सेट तयार करण्यासाठी तब्बल 250-300 कामगारांची मदत लागली. पण लॉकडाऊनमुळे सेटचा उपयोग झाला नाही. मुंबईत पावसाने देखील जोर धरला आहे. त्यामुळे ‘टायगर 3’ चित्रपटाचं सेट उध्वस्त झालं आहे.

सांगायचं झालं तर चित्रपटात कतरीना कैफ आणि सलमान खान मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. तर अभिनेता इमरान हाशमी खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.