कोविड प्रतिबंधासाठी कोलचिसिन औषधावर चाचण्या करण्यास परवानगी

भारतीय औषध महानियंत्रकांनी सीएसआयआर व लक्साई लाइफ सायन्सेस प्रा. लि. यांना कोलचिसिन या औषधावर चाचण्या करण्यास परवानगी दिली आहे. हे औषध कोविड प्रतिबंधासाठी वापरता येऊ शकते.

सीएसआयआरच्या महासंचालकांचे सल्लागार राम विश्वाकर्मा यांनी सांगितले की, हृदयरोग व इतर सहआजार असलेल्या व्यक्तींमध्ये या औषधाचा वापर करता येऊ शकतो. अपायकारक सायटोकिन्सवरही त्याचा उपयोग होऊ शकेल. कोविड असलेल्या रुग्णात उपचारानंतर हृदयविकारात गुंतागुंत निर्माण होते. त्यातून अनेक लोकांचे प्राण गेले होते. त्यामुळे त्यासाठी फेरउद्देशित औषध किंवा नवीन औषधे शोधण्याची नितांत गरज आहे. सीएसआयआर व लक्साई लाइफ सायन्सेस प्रा. लि. यांच्या सहकार्यातून उपरोल्लेखित औषधाच्या चाचण्या घेण्याची परवानगी देण्यात आली. त्याच्या दुसऱ्या टप्प्यातील सुरक्षा व परिणामकारकता चाचण्या घेण्यात येतील. कोविड १९ रुग्णांवरील उपचारात वैद्यकीय परिणामकारकता सुधारण्यासाठी हे औषध उपयोगी आहे.

सीएसआयआर समवेत या चाचण्यांत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी हैदराबाद तसेच जम्मूची भारतीय एकात्मिक वैद्यक संस्था सहभागी आहेत.

कोलचिसिन या औषधाचा भारत हा मोठा उत्पादक देश असून जर चाचण्या यशस्वी झाल्या, तर हे औषध किफातयशीर किमतीत रुग्णांना देता येईल, असे आयआयसीटीचे संचालक एस. चंद्रशेखर यांनी सांगितले. लक्साई लाइफ सायन्सेसचे मुख्य कार्यकारी अधिकारी राम उपाध्याय यांनी सांगितले की, लोकांनी चाचण्यांसाठी नावे नोंदवली असून भारतात अनेक ठिकाणी ८ ते १० आठवड्यांत या चाचण्या करण्यात येणार आहेत. चाचण्यांचे निकाल सकारात्मक आले, तर हे औषध मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.