संताप अनावर झाल्यानं अंपायरला लाथ मारणाऱ्या आणि मैदानात गैरवर्तन करणाऱ्या खेळाडूवर चांगलाच चाप लावण्यात आला आहे. या ऑलराऊंडर खेळाडूवर बंदीसोबतच दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. ढाका प्रीमियर लीग (DPL) 2021) दरम्यान सुरू असलेल्या सामन्यात बांग्लादेशचा ऑलराऊंडर शाकिब अल हसन याच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्याच्यावर तीन सामन्यांसाठी बंदी घालण्यात आली असून 5 लाख रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
मोहम्मडन स्पोर्टिंगचा कर्णधार शाकिब अल हसन ढाका प्रीमियर लीग दरम्यान मैदानात गैरवर्तन केल्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. मैदानात संताप अनावर न झाल्याने त्याने अंपायरला लाथ मारली आणि स्टंप फेकून दिले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल झाल्यानंतर तातडीनं कारवाई करण्यात आली आहे.
या संपूर्ण प्रकरणानंतर शाकिबने आपल्या गैरकृत्याबद्दल ट्विटरवर माफी मागितली आहे. मैदानात अशाप्रकारे गैरवर्तन केल्यानंतर त्याच्यावर चाप लावण्यासाठी दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. शाकिबला पुढच्या तीन सामन्यांसाठी बंदी घालण्यात आली असून 5 लाख रुपयांचा दंड लावण्यात आला आहे. या शिवाय त्याला ताकीदही देण्यात आली आहे