लतादिदींवर मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात अंत्यसंस्कार करण्यात आले. लतादिदींच्या जाण्याने देशाचा सूर हरपला आहे. सारा देश हळहळ व्यक्त करत आहे.
देशाचे पंतप्रधान मोदी उपस्थित लावत आदरांजली वाहिली. दिदींना निरोप देण्यासाठी अनेक क्षेत्रातील दिग्गजांनी उपस्थिती लावली होती. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे असे मोठे नेतेही उपस्थित होते. त्याचबोरबर छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील सुभाष देसाई हे मंत्रीही अंत्यस्काराला आलेले दिसून आले.
फक्त नेतेमंडळीच नाही तर बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांनीही आंदरांजली वाहण्यासाठी उपस्थिती लावली होती. यावेळी शाहरुख खान, जावेद अख्तर अशी अनेक मंडळी छत्रपती शिवजी पार्कवर दाखल झाल्याचे दिसून आले.
राज्य सरकारने दुखवटा जाहीर केला आहे. त्यानिमित्ताने आज सोमवार 7 फेब्रुवारी रोजी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. केंद्र सरकारपाठोपाठ राज्य सरकारनेही राजकीय दुखवटा जाहीर केल्याने दोन दिवस सर्व सरकारी कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.
तसेच मंत्रालयावरील तिरंगा झेंडा अर्ध्यावर उतरवण्यात आला आहे. तसेच संसदेसह देशभरातील विधानसभा, मंत्रालये, सचिवालये आणि सरकारी कार्यालयांवरील तिरंगा अर्ध्यावर उतरवण्यात आला आहे. सैन्याच्या तिन्ही दलांनी यावेळी दिदींना मानवंदना दिली. दिदींच्या जाण्याने देशभर शोकाकूल वातावरण आहे.