भारतात तब्बल 61 करोड लोकांचे लसीकरण

देशभरात कोरोनाविरोधातील लसीकरण मोहिमेला वेग देण्यात येतोय. केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, भारतात तब्बल 61 करोड लोकांना आतापर्यंत लस टोचण्यात आली आहे. तर गुरुवारी 68 लाख लसीचे डोस देण्यात आले.

गुरुवारी झालेल्या लसीकरणानंतर केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी भारताने लसीकरणाच्या बाबतीत नवा विक्रम स्थापन करण्याची घोषणा केली आहे. आरोग्यमंत्र्यांच्या माहितीप्रमाणे, देशात आतापर्यंत 50 टक्के लोकांना पहिली लस देण्यात आली आहे.

केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी ट्विट केलंय. ते त्यांच्या ट्विटमध्ये म्हणतात, “भारताने अभूतपूर्व कामगिरी केली! कोरोना लसीचा पहिला डोस लसीकरण केलेल्या लोकसंख्येच्या 50 टक्के लोकांना देण्यात आला आहे. देशाने याला कायम ठेवलं पाहिजे. चला कोरोना विरुद्ध लढूया.”

भारतातील लसीकरण मोहिमेला आता आणखी वेग येणार आहे. आता लवकरच देशातील 12 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांना कोरोना लस (Children Vaccine) मिळणार आहे. 12 ते 17 वयोगटातील मुलांचे ऑक्टोबरपासून लसीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे सुरु असलेल्या लसीकरण मोहिमेला आणखी वेग येणार आहे. गंभीर आजार असलेल्या मुलांना लसीकरणात प्राधान्य दिले जाणार आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून मुलांचं लसीकरण करण्यात येणार आहे. 12 ते 17 वयोगटातील मुलांना झायडस कॅडिला लस (Zydus Cadila) देण्यात येणार आहे.

दरम्यान, सरकारच्या कोविड-19 वर्किंग ग्रुप कमिटीचे प्रमुख डॉ. एनके अरोरा यांनी सांगितले, भारतात 12 ते 17 वयोगटातील सुमारे 12 कोटी मुले आहेत, त्यापैकी एक टक्क्यांपेक्षा कमी मुलांना आरोग्य समस्या असू शकतात, असा अंदाज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.