लेनोवोचा नवा लॅपटॉप मिळणार अगदी स्वस्तात

कोरोनामुळे वर्क टु होमची (Work To Home) नवी पद्धत सुरु झाली. ऑफीसचं काम घरी आलं. त्यामुळे ऑफीसमधल्या कॉम्प्युटरची जागा लॅपटॉपने घेतली. शाळा, कॉलेजचा अभ्यासक्रमही ऑनलाईन पद्धतीने सुरु होता. मोठ्या प्रमाणात वर्क टु होम तसेच ऑनलाईन अभ्यासक्रमामुळे अचानक लॅपटॉपच्या वापरात वाढ झाली. यामुळे लॅपटॉपची चांगलीच मागणी वाढली. तेव्हापासून ते आतापर्यंत लॅपटॉपची मागणी कायम आहे. जर तुम्ही लॅपटॉप (Laptop) घेण्याच्या विचारात असाल, तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे.

लेनोवोने नुकताच नवा लॅपटॉप लॉन्च केला आहे. या नव्या क्रोमबुकमध्ये अनेक फीचर्स आहेत. लेनोवो क्रोमबुकमध्ये 4G साठी AMD प्रोससर आणि सपोर्टही दिला जाऊ शकतो. पण याची खरेदी केवळ अमेरिकी कॅरियर आणि AT&T द्वारे खरेदी केलं जाऊ शकतं.

लेनोवो क्रोमबुक 300E चा डिस्पले हा 11.6 इंच इतका आहे. विशेष म्हणजे डिस्प्लेहा गोरिला ग्लास प्रोटेक्टेड आहे. तसेच हा क्रोमबुक स्पिल रजिस्टेंट आहे. म्हणजेच याचा वापर टॅबलेट म्हणूनही केला जाऊ शकतो. या Lenovo Chromebook 300E ची किंमत आणि वैशिष्ट्य काय आहेत जाणून घेऊयात.

लेनोवो क्रोमबुकची किंमत जवळपास 31 हजार 150 रुपये इतकी आहे. पण ग्राहक हा क्रोमबुक ईएमआयवर घेऊ शकतात. ग्राहक 36 महिन्यांच्या पेमेंट ऑप्शननुसार खरेदी करु शकतात. त्यानुसार दर महिन्याला ग्राहकाला केवळ 865 रुपये (Lenovo Chromebook 300E price in india) मोजावे लागतील. या लेनोवो क्रोमबुकच्या प्री ऑर्डरला 10 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. तर ऑनलाईन आणि दुकानात 28 सप्टेंबरपासून उपलब्ध असतील.

क्रोमबुकला पॉवर करणे हा ड्युअल-कोर AMD 3015Ce प्रोसेसर आहे. हे नवीन डिव्हाइसला Chrome Unboxed नुसार LTE सह पहिले AMD Chromebook बनवतं. चिपसेटची बॅटरी 47Wh आहे. तसेच हा लॅपटॉप एकदा चार्ज केल्यावर 24 तास चालेल, असा दावा कंपनीने केला आहे. Chromebook मध्ये 4GB रॅम आणि 32GB स्टोरेज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.