भाजपने माघार घेण्याचं श्रेय राज ठाकरेंना द्यायचं का? शरद पवार हसले आणि म्हणाले….
‘अंधेरी पोटनिवडणुकीमध्ये भाजपने माघार घेणार याची मला खात्री होती. काही तरी सकारात्मक निर्णय घेतला जाईल. अखेर त्यांनी निर्णय घेतला आहे, त्याबद्दल मी समाधानी आहे, 6-7 अपक्ष आहे त्यातला एक जरी राहिला तरी निवडणूक होतील, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली. तसंच, राज ठाकरे यांना याचे श्रेय द्यायचे असेल तर देऊन टाका, असा टोलाही पवारांनी लगावला.
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये भाजपवर माघार घेण्याची मोठी नामुष्की आली. भाजपने माघार घ्यावी यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन विनंती केली. भाजपने अखेर आज माघार घेतली. यावर पवार यांनी प्रतिक्रिया दिली.
ग्रामपंचायत निवडणूक ; भाजप-शिंदेंना मोठा धक्का, या तालुक्यात सर्व जागांवर पराभव
महाराष्ट्रातल्या ग्रामपंचायतींचे निकाल आज जाहीर होत आहेत. या निकालानंतर नाशिकमध्ये भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला जबर धक्का बसला आहे. नाशिकच्या पेठ तालुक्यामध्ये भाजप आणि शिंदेंच्या पक्षाचा एकही उमेदवार निवडून आला नाही.पेठ तालुक्यामध्ये एकूण 71 ग्रामपंचायती आहेत, यातल्या 69 ग्रामपंचायतींमध्ये निवडणुका झाल्या तर दोन ठिकाणचे निकाल बिनविरोध लागले. तालुक्यात 29 ग्रामपंचायतींवर अपक्ष, 23 ठिकाणी राष्ट्रवादी, 17 ठिकाणी शिवसेना ठाकरे गट, 1 ठिकाणी काँग्रेस आणि एका ठिकाणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा विजय झाला.तरी हाती आलेला निकाल असा…
ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप नंबर वन!
राज्यातील ११६५ पैकी १०९८ ग्रामपंचायतचे निकाल जाहीर👇
भाजपा – २३९
शिंदे गट – ११३
राष्ट्रवादी – १५५
ठाकरे गट – १५३
काँग्रेस – १४३
इतर – २९५
दीपिका पदुकोणच्या कारकिर्दीत मानाचा तुरा; अभिनेत्रीचा जगातील सर्वात सुंदर महिलांमध्ये समावेश
अभिनेत्री दीपिका पदुकोण ही भारतीय प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री आहे.तिने आपल्या निखळ सौंदर्याने आणि दमदार अभिनयाने भारतीय चित्रपटसृष्टीत आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. भारताप्रमाणेच देशाबाहेरसुद्धा तिची लोकप्रियता अधिक आहे.आता दीपिकाच्या कारकिर्दीत अजून एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.नुकतीच जगातील सर्वात सुंदर दहा महिलांची नावे जाहीर करण्यात आली असून, यामध्ये बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणनेही आपले स्थान निर्माण केले आहे.जगातील 10 सुंदर महिलांमध्ये दीपिका पदुकोणचा समावेश झाला आहे. दहाव्या क्रमांकावर निवडलेली दीपिका ही भारतातून निवड झालेली एकमेव महिला आहे.जगातील सर्वात सुंदर महिलांची यादी प्राचीन ग्रीक गणिती पद्धती नुसार काढली जाते. ज्याचे नाव आहे ‘गोल्डन रेशो ऑफ ब्युटी’ असे आहे.यावेळी लंडनस्थित गणितज्ञ ‘डॉ डी सिल्वा’ यांनी ही यादी तयार केली आहे. यंदाच्या यादीनुसार हॉलिवूड अभिनेत्री जोडी कोमरने या यादीत अव्वल स्थान पटकावले आहे. कोमरच्या चेहऱ्याचे प्रमाण 94.52% वर आले आहे. दुसरीकडे, दीपिका पदुकोणने पद्धतीनुसार 91.22% गुण मिळवले आणि ती 10 व्या स्थानावर आहे.
अजित पवारांच्या अडचणी वाढणार?, दोन वर्षांपूर्वी बंद झालेली फाईल पुन्हा उघडणार!
विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे, कारण आर्थिक गुन्हे शाखेला महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याची दोन वर्षांनंतर पुन्हा चौकशी करायची आहे. दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याची चौकशी बंद करण्यात आली होती. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने हे प्रकरण पुन्हा उघडून घोटाळ्याची अधिक चौकशी करायची असल्याचं, शनिवारी मुंबई सत्र विशेष न्यायालयात म्हटलं होतं.
कौतुकास्पद! दिव्यांग अन् दृष्टिदोष असलेल्या मुलींना शिक्षिका देतेय सेल्फ डिफेन्सचे धडे
महिला आणि मुलींसोबत गैरवर्तन होत असल्याच्या घटना सतत आपल्या कानावर पडत असतात. सार्वजनिक ठिकाणं, कामाच्या कार्यालयांपासून ते अगदी स्वत:च्या घरातदेखील महिला सुरक्षित नसल्याचं वेळोवेळी सिद्ध झालं आहे. इतकंच काय, तर अश्लील भाषा किंवा मीडिया फाइल्स वापरून ऑनलाइन पद्धतीनेही महिलांची हॅरॅसमेंट केली जाते. अशा असुरक्षित ठिकाणांमध्ये शाळा-महाविद्यालयांचाही समावेश होत आहे. गेल्या काही वर्षांमध्ये शाळा-महाविद्यालयांमध्ये विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार झाल्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. अशा घटनांमुळे राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातल्या एका सरकारी शाळेतल्या शिक्षिकेने अनोख पाऊल उचललं आहे. आशा सुमन असं नाव असलेल्या या शिक्षिकेने आपल्या विद्यार्थिनींना, विशेषत: दृष्टिदोष व श्रवणदोष असलेल्या मुलींना सेल्फ डिफेन्सचे धडे देण्यास सुरुवात केली आहे.
अलीकडे शाळकरी मुलींची छेड काढण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. ही बाब लक्षात घेऊन अलवर जिल्ह्याच्या राजगड परिसरातल्या खरखडामधल्या प्राथमिक शिक्षिका आशा सुमन यांनी मुलींना सेल्फ डिफेन्सचे धडे देण्याचा निर्णय घेतला. 2015 मध्ये पोलिस विभागाने आयोजित केलेल्या प्रशिक्षण शिबिरात आशा सुमन यांनी सहभाग घेतला होता. तिथूनच कोणत्याही शस्त्राचा वापर न करता मुलींना सेल्फ डिफेन्सचं प्रशिक्षण देण्याची प्रेरणा आशा यांना मिळाली.
भारत जोडो यात्रेतील सर्वात खास गिफ्ट; आजी इंदिरा गांधींच्या आठवणीत राहुल गांधी भावुक!
राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला देशभरात मोठा प्रतिसाद मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली होत असलेल्या या यात्रेने एक हजार किलोमीटरचं अंतर पार केलं आहे. दरम्यान राहुल गांधींना एका वृद्ध महिलेने खास गिफ्ट दिलं. याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
ही वृद्ध महिला राहुल गांधीसाठी आपल्या शेतातून काकड्या घेऊन आली होती. यावेळी ती म्हणते की, माझं कुटुंब खूप गरीब आहे. माझ्याजवळ संपत्तीच्या नावाखाली एक शेतच आहे. जे तुमची आजी इंदिरा गांधी यांच्या भूमी सुधार अधिनियमामुळे मिळालं होतं. ही काकडी त्याच शेतातील आहे.
हॅरी ब्रूकच्या विस्फोटक खेळीने इंग्लंडचा पाकिस्तानवर सहा गडी राखत दणदणीत विजय
टी२० विश्वचषकाच्या सराव सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानचा पराभव केला. त्यांनी सोमवारी बिस्बेन येथील गाबा येथे सहा गडी राखून विजय मिळवला. पावसामुळे हा सामना १९-१९ षटकांचा खेळवण्यात आला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने आठ गडी गमावून १६० धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंड संघाने १४.४ षटकांत ४ गडी गमावत १६३ धावा केल्या आणि सामना जिंकला. या सामन्यात पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीने दोन षटके टाकली. या काळात त्याला एकही विकेट मिळवता आली नाही. आफ्रिदीने दुखापतीतून पुनरागमन केले आहे.
विराट कोहलीने घेतलेली ‘ही’ कॅच पाहून ऑस्ट्रेलियाचे खेळाडूही थक्क
टी २० विश्वचषक २०२२ च्या पहिल्या सराव सामन्यात टीम इंडियाने गतविजेत्या आॕस्ट्रेलिया संघाला धुळ चारली. ब्रिस्बेनच्या गाबा मैदानावर झालेल्या सामन्यात मोहम्मद शमीने शेवटच्या ओव्हरमध्ये ४ विकेट्स घेऊन ऑस्ट्रेलियावर सहा गडी राखत विजय मिळवला. मोहम्मद शमीच्या षटकात विराट कोहलीची जादू पाहायला मिळाली. विराटने खेळाच्या शेवटच्या टप्प्यात अत्यंत महत्त्वाची विकेट घेतली, जवळपास अशक्य वाटणारी ही विकेट घेऊन माजी कर्णधाराने सामना टीम इंडियाच्या बाजूने फिरवला. कोहलीने झेललेली ही कॅच सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होत आहे.
ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी केली होती. उपकर्णधार केएल राहुलने उत्तम सुरुवात करून संघाला १८७ धावांपर्यंत घेऊन जाण्यात मदत केली. लोकेशने २७ चेंडूंत ५० धावा करताना ३ षटकार व ६ चौकार लगावत ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची दाणदाण उडवली होती. १८७ धावांचा पाठलाग करताना पॉवर प्लेमध्येच ऑस्ट्रेलियाच्या मिचेल मार्श व अॅरोन फिंच यांनी भारतीय गोलंदाजांना चिंतेत टाकले होते. भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंग यांनी एक एक करत ऑस्ट्रेलियन खेळाडूंना पॅव्हेलियनमध्ये धाडले मात्र तरीही सामना पूर्णपणे भारताच्या हातात आला नव्हता.
SD Social Media
9850 60 3590