रशियाच्या हल्ल्यात युक्रेनमध्ये अनेक घरे उद्ध्वस्त 300 जण ठार

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनच्या दहा शहरांवरती हल्ला केला आहे. त्यामुळे युक्रेनमधल्या शहराचं मोठ नुकसान झाल्याचं पाहायला मिळतंय. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युध्द घोषित केल्यापासुन युक्रेनमधील हवाई वाहतूक पुर्णपणे बंद करण्यात आली आहे.

ही एक लष्करी कारवाई असून यामुळे युक्रेनमधील कोणत्याही नागरिकाला त्रास होणार नाही असं रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सांगितले आहे. परंतु युध्दात अनेक समान्य माणसांना तिथं लक्ष केल जात असल्याचं समजतंय. रशियाने युध्द पुकारल्यानंतर सुरूवातीला युक्रेनच्या 10 मोठ्या शहरांवरती बॉम्ब हल्ला केला आहे, त्यामुळे युक्रेनची परिस्थिती बिकट असल्याचे व्हिडीओच्या माध्यमातून समजते आहे.

कीव, खार्किव, चिसिनो या भागात रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी लष्करांच्या मदतीने हल्ला केला आहे. तसेच युक्रेनधील अनेक शहरांमध्ये आत्तापर्यंत बॉम्बस्फोट झाल्याची माहिती मिळत आहे. युक्रेनमधल्या समुद्राजवळ दोन मोठे स्फोट झाल्याचं समजतंय. युक्रेनची राजधानी किवमध्ये देखील स्फोटाचे दोन आवाज आल्याची माहिती मिळत आहे. क्रॅमटोर्स्क, बर्दियान्स्क आणि निकोलायव्ह शहरांमध्ये मोठे स्फोट झाल्याचं वृत्त आहे. आत्तापर्यंत मिळालेल्या सगळ्या माहितीमधून ओडेसामध्ये बॉम्ब हल्ल्याने अधिक नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे.
रशियाकडून हल्ल्याची सुरुवात झाल्यानंतर युक्रेनच्या राष्ट्रपतींनी तिथल्या लोकांना आवाहन केलं आहे की, हल्ल्याने घाबरून जाऊ नका.

तसेच तिथं मार्शल लॉ ची घोषणा राष्ट्रपतींकडून करण्यात आली आहे.
रशियाकडून युध्दात कोणत्याही सामान्य व्यक्तीला त्रास होणार नाही असं सांगितलं जात आहे, परंतु युक्रेनमधल्या आत्तापर्यंत 300 लोकांचा जीव गेल्याची माहिती युक्रेनकडून जाहीर केली आहे. तसेच युक्रेनमधील सर्व लष्करीसाठा उद्वस्त केला असल्याचे युक्रेनकडून जाहीर करण्यात आले आहे.
रशियाने युध्दाला सुरूवात केल्यानंतर तिथं झालेल्या मृत्यूला आणि विध्वंस झालेल्या घटकाला फक्त रशिया जबाबदार आहे, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी म्हटलं आहे. तसेच अमेरिका आणि इतर मित्र पक्ष त्यांना चांगलचं उत्तर देतील.

युक्रेनमध्ये राहत असलेल्या लोकांना घेऊन येण्यासाठी एक विमान युक्रेनला रवाना झालं होतं. परंतु तिथं हल्ला झाल्यानंतर विमान रिकामं परतलं आहे.
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी अमेरिका आणि फान्सच्या राष्ट्रध्यांशी चर्चा केल्याचं समजतंय.
रशियाकडून युक्रेनच्या लष्करावरती इतका भयानक हल्ला केला आहे, की तिथली लोक हल्ल्याचा आवाज आणि जाळपोळ पाहून हादरून गेले आहेत.
रशियाकडून बॉम्ब हल्ला होत असल्याने नागरिक अधिक चिंतेत आहेत, त्यामुळे राजधानी कीवमध्ये अधिक नुकसान झाल्याचं समजतंय.

युक्रेनने केलेल्या प्रतिकारात रशियन फायटर जेट नष्ट करण्यात आले आहे. त्याचबरोबर रशियाची पाच विमाने पाडली असून रशियाचं आणखी एक हेलिकॉप्टर देखील पाडण्यात आलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.