सेन्सेक्स तब्बल 2000 पेक्षा जास्त अंकांनी कोसळला

रशिया-युक्रेन यांच्यातील ताणलेल्या संबंधाचे पडसाद मुंबई शेअर बाजारावर दिसून येत आहेत. गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं सेन्सेक्सची पडझड सुरु होती. दरम्यान, सलग सहाव्या सत्रात शेअर मार्केटमध्ये मोठा फटका बसला आहे. अशातच गुरुवारी सकाळी गुंतवणूकदारांना मोठा झटका बसला आहे. तब्बल 2 हजार अंकानी सेन्सेक्सची पडझड झाली आहे. तर दुसरीकडे निफ्टीचीही घसरण झाली आहे.

या पडझडीमुळे एका झटक्यात तब्बल 9 लाख कोटी रुपयांचं नुकसानं झालंय. निफ्टीचे सर्वच्या सर्व 50 शेअर्स हे रेडझोनमध्ये गेले आहे. तर सेन्सेक्सच्याही 30 शेअर्सला मोठा फटका बसलाय. रशियानं युक्रेनवर हल्ला केलाय. त्या हल्लाचे पडसाद जागतिक बाजारपेठेवर होताना पाहायला मिळत आहेत. याचा फटका मुंबई शेअर बाजारावरही होतोय. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा सेन्सेक्स (SENSEX) तब्बल 2080 अंकांनी कोसळला होता. तर निफ्टी 548 अंकांनी खाली आला होता. यामुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदारही कमालीचे धास्तावले आहेत.

रशियानं युक्रेवर हल्ला केल्यानंतर शेअर बाजारात मोठी पडझड पाहायला मिळाली आहे. SGC मध्ये 300 अंकांची मोठी घट पाहायला मिलाली आहे. डाओ फ्युचर्सचा शेअरही 180 अंकांनी घटलाय. तर तिकडे बुधवारी डाओ जोन्स 465 अंकानी खाली ते आतापर्यंतच्या सगळ्या कमी अंकावर आल्याची नोंद करण्यात आली आहे.

NSEवर सगळ्याच सेक्टरमधील इंडेक्समध्ये घट नोंदवण्यात आली आहे. सगळ्यात जास्त फटका हा निफ्टी पीएसयू बँक इंडेक्सला बसला आहे. पीएसयू बँक इंडेक्सला 4.30 टक्के इतकी घट नोंदवण्यात आली आहे. यासोबत निफ्टी बँक इंडेक्स, निफ्टी ऑटो इंडेक्स तसंच निफ्टी आयटी इंडेक्स तीन टक्क्यांची घट नोंदवण्यात आली आहे.

दरम्यान, कच्च्या तेलाच्या किंमतीही विक्रमी दरांवर पोहोचल्या आहेत. गुरुवारी क्रूड ऑईलची किंमत 100 डॉलर प्रति बॅरली इतकी नोंदवण्यात आली आहे. आठ वर्षांत पहिल्यांदाच इतकी जास्त रक्कम कच्च्या तेलाची झाली असून आता याचा थेट फटका इंधनांच्या दरांवरही पाहायला मिळणार, हे नक्की!

शेअर बाजारातील आजच्या पडझडीनं गु्ंतवणूकदारांचे तब्बल 9 लाख कोटी रुपये बुडालेत. त्यामुळे शेअर बाजारातील सर्वच गुंतवणूकदार कमालीचे धास्तावलेत. बीएसई लिस्टेट एकूण कंपन्यांचं मार्केट कॅप हे 2,55,68,848.42 कोटी रुपये होतं. मात्र शेअर बाजारातील पडझडीमुले आता हेच मार्केट कॅप 2,46,63,726.50 कोटी रुपयांवर आलं आहे. आतापर्यंतच्या सलग सहाव्या सत्रात शेअर बाजारात पडझडीची नोंद झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.