देशातील इतर बोर्डांच्या परीक्षा देखील पुढे ढकलण्यात आल्या आहेत.जेईई मेन एप्रिल सत्राची परीक्षा 27 एप्रिल ते 30 एप्रिल दरम्यान होणार आहे. जेईई मेनच्या विद्यार्थ्यांकडून आता परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी होत आहे. विद्यार्थी #POSTPONEJEEMains2021 ही मोहीम राबवत आहेत. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांच्याकडे विद्यार्थ्यांनी मागणी केली आहे.
नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA)कडून जेईई मेन परीक्षा एप्रिल सत्राचे अँडमिट कार्ड लवकरच जाहीर केले जाण्याची शक्यता आहे. एप्रिल सत्राची परीक्षा 27 ते 30 एप्रिल दरम्यान घेण्यात येणार आहे. जेईई मेन एप्रिल सत्रामध्ये फक्त एका पेपरचे आयोजन केले जात आहे. ज्या विद्यार्थ्यांना बीई / बीटेक अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यायचा आहे. ते अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा जेईई मेन पेपर 1 ची परीक्षा देतील. नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या माहितीनुसार यावेळी जेईई मेन पेपर 2 (बी. आर्क) आणि (बी.प्लॅनिंग) चं आयोजन एप्रिल सत्रामध्ये केलं जाणार नाही.
वाढत्या कोरोना विषाणू संसर्गामुळे 18 एप्रिलला होणारी NEET PG परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आली होता. त्यामुळे जेईई मेन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी देखील परीक्षा लांबणीवर टाकण्याची मागणी केली आहे.