राज्यात शेतकऱ्यांना अनेक संकटाला सामोरे जात असतानाच आता अस्मानी संकटाला सामोरे जावे लागणार आहे. मागच्या काही दिवसांत खराब हवामानामुळे शेतकरी संकटात सापडत चालला आहे. कधी हवेत गारवा तर कधी उन्हाचा तडाखा बसत असल्याने पिके वाळून जात होती. तर अचानक वादळी वाऱ्यासह पाऊस होणार असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
दरम्यान नागपूर जिल्ह्यात पाऊस झाला आहे. पावसासह गारपीट झाल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. 13 मार्चनंतर राज्यात जिल्ह्यात पुन्हा पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.