सपना चौधरीच्या डान्सचा जलवा तर सर्वांनीच पाहिला आहे. सपनाच्या डान्स आणि गाण्यांनी भल्या भल्यांना वेड लावलं. मात्र आता सपनाला टफ फाईट देण्यासाठी हरियाणाच्या आर.सी. उपाध्याय स्टेजवर उतरली आहे. या डान्सरने चाहत्यांना वेड लावलं आहे. तिचा हा डान्स सोशल मीडियावर चांगलीच आग लावत आहे.
आर. सी उपाध्यायचा डान्स हरियाणामध्ये खूप प्रसिद्ध आहे. तिची उर्जा आणि बोल्ड अदांमुळे ती प्रसिद्धी झोतात आली. स्टेजवर ज्या डेअरिंगने ती नाचते त्याला प्रेक्षकांनीही खूप उत्तम प्रतिसाद दिला आहे. तिच्या डान्सचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ती जरा जास्तच बोल्ड डान्स करताना दिसत आहे.
तिच्या या बोल्ड डान्स मुळे सोशल मीडियावर हा व्हिडीओ चर्चेत आहे. काही चाहते हा स्टेजतोड परफॉर्मन्स असल्याचंही म्हणत आहेत. सुनीता बेबी देखील यावेळी स्टेजवर उपस्थित होती. तिही हरियाणामध्ये डान्सर म्हणून प्रसिद्ध आहे.
सपना चौधरीनंतर अनेकजण प्रसिद्धी मिळवण्यासाठी स्टेज डान्सर म्हणून पुढे येऊ लागल्या. आर. सी उपाध्यायचा बोल्ड डान्स पाहून सुनीता बेबी देखील हैराण झाल्याचं दिसत आहे. हरियाणवी डान्सर्समध्ये आतापर्यंत हा सर्वात बोल्ड डान्स असल्याची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.