उतावळा नवरा आणि गुडग्याला बाशिंग ही म्हण आपण नेहमी एकतो. पण असा खरा खुरा प्रकार नांदेडमध्ये घडला . लग्नासाठी एका नवरदेवाने पुरातून चक्क 7 किलोमीटर प्रवास केला. नदीतून जाणारी ही अनोखी वरात सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. नांदेड जिल्ह्यात संततधार पावसामुळे पूर आला आहे.
नांदेडमधील हदगाव तालुक्यात पैनगंगा, कयाधु नदीला पूर आला आहे. नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पाणी जमा झालं आहे. त्यामुळे अनेक मार्ग बंद करण्यात आले आहेत. हदगावमधील करोडी येथील युवक शहाजी राकडे याचा विवाह यवतमाळ जिल्ह्यातील उमेरखेड तालुक्यातील चिंचोळी येथील गायत्री गोंडाडे या युवतीशी जमला.
14 जुलै रोजी हळद आणि टिळयाचा कार्यक्रम अन् 15 जुलै रोजी लग्न ठरलं. पण मागील अनेक दिवसांपासून नांदेडमध्ये तुफान पाऊस सुरू आहे. अनेक रस्ते मार्ग बंद आहे. हदगाव – उमरखेड हा मार्ग बंद झाला. पण कोणत्याही परिस्थितीत लग्न करायचा असं ठरवलेल्या नवरदेवाने पुराच्या पाण्यातून वरात काढली. करोडी ते चिंचोली असा तब्बल 7 किलोमीटरचा प्रवास थर्माकोलचच्या हुड्यावर करून हा पठा लग्न स्थळी पोहचला. टिळा आणि हळदीचा कार्यक्रम पूर्ण झाला. आज लग्न होणार आहे.