औरंगाबादमध्ये आज राज ठाकरेंची तोफ धडाडणार आहे. राज गर्जनेची तयारी जोरदार करण्यात आली आहे. भोंग्यांवरून सरकारला अल्टिमेटम दिल्यानंतर राज ठाकरेंच्या आजच्या सभेकडे राज्यासह देशाचं लक्ष लागलं आहे.
आज राज ठाकरे कुणाला टार्गेट करणार? आजच्या सभेत काय बोलणार, याचीच उत्सुकता मनसे कार्यकर्त्यांसह विरोधकांनाही आहे. यावेळी राज ठाकरेंच्या सभेला कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला.
बंदोबस्तासाठी 3 हजार कर्मचारी, अधिका-यांचा ताफा मागवला आहे. तर सभेच्या प्रत्येक हालचालींवर सीसीटीव्हीची नजर राहणार आहे. राज ठाकरेंच्या सभेसाठी आज दुपारी दोन वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत औरंगाबादमध्ये वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबादमध्ये होत असलेल्या सभेसाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यासाठी बाहेरील जिल्ह्यातून अतिरिक्त पोलिसांची कुमक मागवण्यात आली आहे. सभेआधी पोलीस तैनात करण्यात आले आहेत.
राज ठाकरे यांच्या सभेसाठी पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. सभा उधळून देण्याचा इशारा काही संघटनांनी दिल्याने कोणताही धोका पत्करण्यास पोलीस तयार नाहीत.
या मार्गावर राहणार वाहनबंदी
जुनी मल्टिपर्पज शाळा ते नारळी बाग
आयटीआय ते खडकेश्वर टी पॉईंट
ज्युबली पार्क ते मराठवाडा सांस्कृतिक मंडळ मैदानाकडे जाणारा रस्ता
आशा ऑप्टिकल ते मराठवाडा सांस्कृतिक मंडळ मैदानाकडे जाणारा रस्ता
पर्यायी मार्ग कोणते?
मिलकॉर्नर ते भडकल गेट
मिलकॉर्नर ते महात्मा फुले चौक औरंगपुरा