छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ गेल्या 13 वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. मालिकेतील प्रत्येक कलाकाराने चाहत्यांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली आहे. तर दुसरीकडे मालिकेत बबिता ही भूमिका साकारणारी अभिनेत्री मुनमून दत्ताने तर सर्वांना घायाळ केलं आहे. सध्या बबिताजी बोल्ड अंदाजामूळे नाही तर तिच्या संपत्तीमुळे चर्चेत आली आहे. मुंबईत मुनमून एका भव्य घरात राहात आहेत. ती कायम तिच्या घराचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते.
मुनमून दत्ताच्या घरी एक सुंदर बालकनी देखील आहे. शिवाय तिच्या घराचं इंटेरियर देखील फार आकर्षक आहे. मुनमूनचं घर एखाद्या शाही घराप्रमाणे आहे. मुनमून दत्ता मालिकेच्या एका एपिसोडचे जवळपास 35 ते 50 हजार रूपये मानधन घेते. रिपोर्टनुसार तिच्याकडे 14 कोटी रूपयांची संपत्ती आहे आणि ती एक रॉयल आयुष्य जगते.
दरम्यान मुनमुनने बऱ्याच काळानंतर शोमध्ये कमबॅक केल आहे. मधल्या काळात मुनमुन गायब होती. मुनमुन मध्यंतरी एका व्हीडिओमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. त्यानंतर मुनमुनने सोशल मीडियावरुन जाहीररित्या माफी मागितली होती. यानंतर मुनमुन शोमध्ये दिसत नव्हती. त्यामुळे मुनमुनने हा शो सोडला की काय, असं चाहत्यांना वाटलं होतं. मात्र मुनमुनच्या कमबॅकमुळे आता चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.