रिझव्र्ह बँकेने अलीकडेच व्याजदरांत केलेली वाढ आश्चर्यकारक नव्हती़ मात्र, पण तिची वेळ आश्चर्यकारक होती, असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे.
ऑगस्ट २०१८ नंतर पहिल्यांदाच रिझव्र्ह बँकेने ४ मे रोजी रेपो दरात ४० बेसिस पॉइंटची वाढ केली, तसेच सीआरआर ५० बेसिस पॉइंट्सनी वाढवून ४.५ टक्के केला. युक्रेनमधील युद्धाचा परिणाम म्हणून कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाल्याने अर्थव्यवस्थेवर चलनफुगवटय़ाचा दबाव आल्याचे बँकेने म्हटले होते.
रिझव्र्ह बँकेमार्फत व्याज दरवाढीची वेळ आश्चर्यकारक आहे, पण ही कृती मात्र नाही, कारण हे होणारच होते, याचा लोकांनी विचार केला होता. मात्र, आर्थिक धोरण समितीच्या दोन बैठकांदरम्यान हा निर्णय घेण्यात आल्याने त्याचे आश्चर्य वाटले,’ असे सीतारामन एका कार्यक्रमात बोलताना म्हणाल्या.
अन्य देशांच्या तुलनेमध्ये भारतात महागाईचा दर फारसा वाढलेला नसल्याचे देखील निर्मला सीतारमण यावेळी म्हणाले आहेत.