सीएनजी आणि पीएनजीच्या दरात मोठी कपात

सर्वसामान्यांना मोठा दिलासा!

महानगर गॅस लिमिटेडने सीएनजीच्या दरामध्ये प्रति किलो 6 रुपयांनी आणि पीएनजीच्या दरामध्ये प्रतिकिलो 4 रुपयांनी कपात केली आहे. हे नवे दर आज मध्यरात्रीपासून लागू होतील. सीएनजीच्या किमतीत सातत्याने वाढ होऊन त्याचे दर पेट्रोल-डिझेलच्या दरांजवळ आहे आहेत. त्यामुळे सीएनजी आणि पाइप्ड कुकिंग गॅसच्या वाढलेल्या किमती नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने उद्योगांना मिळणारा काही नॅचरल गॅस दिल्लीतील इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड आणि मुंबईतील महानगर गॅससारख्या सिटी गॅस ऑपरेटरना पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सीएनजी आणि पीएनजीच्या वाढत्या किमती रोखण्यात मदत होणार आहे.

एकीकडे विविध जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढत असताना आज महानगर गॅस लिमिटेडने सर्वसामान्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय जाहीर केला आहे. महानगर गॅस लिमिटेडने सीएनजीच्या दरामध्ये प्रति किलो 6 रुपयांनी आणि पीएनजीच्या दरामध्ये प्रतिकिलो 4 रुपयांनी कपात केली आहे. हे नवे दर आज मध्यरात्रीपासून लागू होतील.

याबाबत माहिती देताना महानगर गॅस लिमिटेडकडून सांगण्यात आले की, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने नैसर्गिक वायूंच्या किमतींचा आढावा घेतल्यानंतर या किमतींमध्ये कपात करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे सीएनजीमध्ये प्रतिकिलो 6 रुपयांनी आणि पीएनजीमध्ये प्रतिकिलो 4 रुपयांनी कपात केली आहे. या कपातीनंतर मुंबईमध्ये सीएनजी हा प्रतिकिलो 80 रुपये दराने आणि पीएनजी प्रतिकिलो 48.50 किलो दराने विक्रीसाठी उपलब्ध असेल.

दरम्यान, पेट्रोलियम मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेमध्ये, गॅस वितरकांना घरगुती उत्पादित गॅसचे वाटप वाढवण्यासाठी पूर्वीच्या आदेशात सुधारणा करण्यात आली होती. अधिकाऱ्यांनी सांगितले होते की, दिल्लीच्या इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड (IGL) आणि मुंबईच्या महानगर गॅस लिमिटेड (MGL) सारख्या शहरांमधील गॅस वितरण कंपन्यांसाठी वाटप 17.5 दशलक्ष घनमीटर प्रतिदिन वरून 2.078 दशलक्ष घनमीटर करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.