100 बिलियन डॉलर क्लबमध्ये गौतम अदानी यांची दणक्यात एन्ट्री

गौतम अदानी यांच्या श्रीमंतीनं यशाचा नवा टप्पा गाठलाय. गेल्या काही दिवसांपासून अदानींच्या शेअर्सनं लोकांना तर मालामाल केलंच. पण त्यांना स्वतःलाही अब्जाधीश बनवलंय. अदानींच्या शेअर्सनं केलेल्या दमदार कामगिरीच्या जोरावर गौतम अदानी यांनी श्रीमंतांच्या स्पर्धेत आता मुकेश अंबानींना पछाडलंय. मुकेश अंबानी यांनाही मागे टाकत अदानींनी पहिला नंबर काढलाय! फक्त देशातीलच नव्हे, तर आशियात सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून आता गौतम अदानी यांच्याकडे पाहिलं जातंय. 100 बिलियन डॉलर क्लबमध्ये गौतम अदानी यांनी दणक्यात एन्ट्री केली आहे.

गौतम अदानी आणि मुकेश अंबानी या दोघांपैकी सर्वात श्रीमंत कोणं?, अशी स्पर्धा लागल्याचं सगळ्यांनीच गेल्या अनेक वर्षांपासून पाहिलेलं आहे. दरम्यान, आता ब्लूमबर्गनं दिलेल्या बिलिनेयर इंडेक्सच्या माहितीनुसार गौतम अदानी जगातील सर्वात श्रीमंत असलेल्या लोकांच्या यादीत दहाव्या स्थानी आहेत. तर त्यांच्या खालोखाल मुकेश अंबानीही अकराव्या स्थानावर आहेत. सर्वाधिक श्रीमंत असण्याची ही स्पर्धा किती अटीतटीची आहे, हे या आकड्यांवरुनही स्पष्ट होतंय.

गौतम अदानी यांच्याकडे एकूण 100 बिलियन डॉलर इतकी संपत्ती आहे. पहिल्यांदाच ते 100 बिलियन डॉलर क्लबमध्ये आले आहेत. मुकेश अंबानी 99 बिलियन डॉलरसह भारतातील श्रीमंतांच्या यादीत दुसऱ्या स्थानी आहेत. 273 बिलियन डॉलरसह एलम मस्क पहिल्या स्थानावर कायम आहेत. दरम्यान, त्या खालोखाल जेफ बेजोस, बर्नाड अनॉल्ट, बिल गेट्स, वॉरेन बफेट, लैरी पेज, सर्गई ब्रिन, स्टीव बॉल्मर, लैरी इलिशन आणि त्यानंतर गौतम अदानी यांचा नंबर आहे.

गौतम अदानी यांचं नशीब 2022 या वर्षात कमालीचं फळफळलंय. 23.5 बिलियन डॉलर इतकी आतापर्यंतची सर्वाधित वाढ त्यांच्या संपत्तीत नोंदवण्यात आली आहे. जगात सर्वाधित संपत्तीत वाढ झालेल्यांच्या यादीत गौतम अदानी हे नंबर एकवर आहेत. दरम्यान, गौतम अदानी यांना संपत्तीच्या बाबतीत टक्कर देणारे मुकेश अंबानी मात्र पिछाडीवर आहेत. या वर्षाच्या सुरुवातीच्या तीन महिन्यात मुकेश यांच्या संपत्तीत 9 बिलियन डॉलर इतकी वाढ नोंदवण्यात आली आहे. संपत्ती वाढण्याच्या क्रमवारीत मुकेश अंबानी पाचव्या स्थानी आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.