घाऊक महागाईचा दर जुलैमध्ये 13.93 टक्क्यांवर, 5 महिन्यांतील नीचांकी पातळी
देशात वाढलेल्या महागाईवर दुहेरी दिलासा मिळाला आहे. किरकोळ महागाईनंतर घाऊक महागाई दरात घट झाली आहे. घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित चलनवाढ जुलैमध्ये 13.93 टक्क्यांवर घसरली, ही या महिन्यातील नीचांकी पातळी आहे. एकीकडे महागाईचा दर कमी होताना दिसत असताना आज दुधाच्या किमतीत दोन रुपयांनी वाढ झाली आहे. अमूल आणि मदर डेअर यांनी दुधाचे दर वाढवले आहेत. हळूहळू इतरही कंपन्या आपले दर वाढवू शकतात. याचा महागाई दरावर नक्कीच परिणाम होण्याची शक्यता आहे.
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने मंगळवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, जुलै महिन्यात घाऊक महागाई दर 13.93 टक्क्यांवर आला आहे, जी जुलै महिन्यातील नीचांकी पातळी आहे. जूनमध्ये घाऊक महागाईचा दर 15.18 टक्के होता, तर मे महिन्यात 15.88 टक्के आणि एप्रिलमध्ये 15.08 टक्के होता. मात्र घाऊक महागाई सलग 16 व्या महिन्यात दुहेरी अंकात राहिली ही काहीशी चिंताजनक बाब आहे. यापूर्वी जुलैमध्ये किरकोळ महागाईचा दरही 7 टक्क्यांच्या खाली आला होता.
IED ब्लास्ट झाला तरी आतील प्रवासी सुरक्षित राहतील; जगातील सर्वात खतरनाक कारने प्रवास करतात पंतप्रधान मोदी
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव काल सोमवारी सर्वत्र साजरा केला. यावेळी 15 ऑगस्टला सकाळी जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्याकडे यायला निघाले तेव्हा संपूर्ण जगाचे लक्ष त्यांच्याकडे होते. लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एंट्री ही Range Rover Sentinel या कारमध्ये झाली. ही कार जगातील सर्वात सुरक्षित आणि तितकीच खतरनाक कारपैकी एक आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची Range Rover Sentinel ही कार कोणताही हल्ला सहज झेलू शकते. याच कारणामुळे या कारचा जगातील सर्वात सुरक्षित कारमध्ये समावेश केला जातो. पैकी एक आहे. हे एक चिलखती वाहन आहे, जे बॉम्ब आणि गोळ्यांचा हल्ला सहन करण्यास सक्षम आहे. पीएम मोदींची ही कार IED स्फोटही सहज सहन करू शकते. यावरून तिची सुरक्षा वैशिष्ट्ये कशी आहेत, हे लक्षात येऊ शकते.
पावसाळी अधिवेशनाआधी महाविकासआघाडीत खडाजंगी, विरोधी पक्षांच्या बैठकीत काँग्रेस नाराज
उद्यापासून राज्य सरकारचं पावसाळी अधिवेशन मुंबईमध्ये सुरू होत आहे. या अधिवेशनाआधी रणनिती ठरवण्यासाठी महाविकासआघाडीच्या नेत्यांची बैठक झाली, पण या बैठकीत काँग्रेसने विरोधी पक्षनेतेपदावरून पुन्हा एकदा नाराजी व्यक्त केली. शिवसेनेकडून विधानपरिषदेत अंबादास दानवे यांची विरोधी पक्षनेता म्हणून नियुक्ती करण्यात आली. काँग्रेसने मात्र हे पद आपल्याला मिळावं, अशी मागणी केली होती.
विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद राष्ट्रवादीला तर विधानपरिषदेत उपसभापतीपद शिवसेनेकडे आहे, त्यामुळे विधानपरिषदेतलं विरोधी पक्षनेतेपद आपल्याला मिळावं, यासाठी काँग्रेस आग्रही होती. विधानपरिषदेमध्ये शिवसेनेचे 12, तर काँग्रेस-राष्ट्रवादीचे प्रत्येकी 10-10 आमदार आहेत.
‘या’ कारणामुळे काही राज्यांमध्ये स्वस्तिक चिन्हाच्या वापरावर बंदी
हिंदू धर्मात स्वस्तिक हे अत्यंत शुभ चिन्ह मानलं जातं. भारतात अध्यात्मिकदृष्टया स्वतिक चिन्हाला विशेष महत्त्व दिलं गेलं आहे. प्रत्येक पूजाविधी किंवा शुभ कार्याची सुरुवात स्वस्तिक काढून केली जाते. पण सध्या स्वस्तिक चिन्ह जोरदार चर्चेत आलं आहे. ऑस्ट्रेलियातल्या काही राज्यांनी या चिन्हावर बंदी घातली आहे. या राज्यांमध्ये स्वस्तिक चिन्हाचा वापर गुन्हा मानला जाणार आहे. अर्थात यामागे काही कारणं आहेत. या चिन्हाचा संबंध नाझी, हिटलर यांच्याशी असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. टीव्ही नाइन हिंदीने या विषयीची माहिती दिली आहे.
पोलीस अधिकाऱ्याच्या गाडीत बॉम्ब ठेवल्याने खळबळ! घटनेने राज्य हादरलं
काही दिवसांपूर्वी पंजाबमध्ये प्रसिद्ध गायक सिद्धू मुसेवाला याची दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात मोठमोठे गुन्हेगार पकडण्यात आले आहे. अजूनही या घटनेचा तपास सुरू आहे. अशा परिस्थितीत पंजाबच्या अमृतसरमधून मोठी बातमी समोर येत आहे. रणजीत अॕव्हेन्यू सी ब्लॉक येथे पोलीस अधिकाऱ्याच्या गाडीत बॉम्ब टाकून दोन मास्कधारी तरुण घटनास्थळावरून फरार झाले आहेत. सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. अमृतसरच्या एका पॉश निवासी भागात सुरक्षेबाबत मोठा निष्काळजीपणा पाहायला मिळाला आहे. सध्या कोणताही पोलीस अधिकारी यावर बोलायला तयार नाही.
‘अजून सुरुवातही झाली नाहीय आणि तुम्हाला एवढी मस्ती आली?’, अजित पवार भडकले
शिवसेनेच्या शिंदे गटाच्या आमदारांवर विरोधी पक्षनेते अजित पवार चांगलेच भडकले. शिवसेनेच्या एका आमदाराने शिसैनिकांना मारहाण करण्याचे आदेश दिले होते, असा दावा पवारांनी केला. तसेच शिवसेनेचे आमदार संतोष बागर यांनी एका सरकारी कर्मचाऱ्याला कानशिलात लगावल्याची घटना ताजी आहे. या घटनांवर अजित पवारांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सत्तेतील काही आमदारांची आणि हिंसक वर्तवणुकीचं समर्थन करतात का? असा सवाल अजित पवारांनी केली. तसेच सत्ता आली म्हणजे मस्ती आली आहे का? कायदा हातात घेतला जातोय. एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हे पटतंय काय? असे सवाल अजित पवारांनी केले आहेत.
मुंबई, ठाण्यासह उपनगरात मुसळधार, लोकल सेवा विस्कळीत
राज्यातील काही भागात पावसाने थैमान घालायला सुरूवात केली आहे. दरम्यान पुणे आणि विदर्भात येलो अलर्ट देण्यात आला आहे तर राज्यातील मुख्य शहर असणाऱ्या मुंबईत सकाळपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुंबई आणि उपनगरात पावसाने जोरदार बॅटींग केल्याने पावसाचे पाणी साचण्यास सुरूवात झाली आहे. होत असलेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. विदर्भासह कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस झाल्याचे पाहायला मिळाले.
मात्र, आज काहीसा पावसाचा जोर कमी झाला आहे. दरम्यान, मुंबईसह परिसरात पावसानं चांगलीच हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले. तसेच कोकणसह पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यात काही ठिकाणी तुरळक पावसानं हजेरी लावली आहे. दरम्यान, आज आणि उद्या कोकणसह पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
भारताचा सुपरहिरो परतणार; हृतिक रोशनचा ‘क्रिश 4’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार
भारतातील प्रेक्षकांना एकेकाळी ‘क्रिश’ या सुपरहीरोने वेड लावले होते. क्रिश हा मेड इन इंडिया हिरोला प्रेक्षकांनी खूपच डोक्यावर घेतले होते. या 3 भाग प्रदर्शित झाले आहेत. या तिन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली होती. पण चाहत्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे आता लवकरच क्रिश चित्रपटाचा चौथा भाग प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. क्रिश चित्रपटाचा नायक हृतिक रोशनने गेल्या वर्षी जूनमध्ये राकेश रोशनच्या ‘क्रिश 4’ ची अधिकृत घोषणा केली होती. तेव्हापासून या बहुप्रतीक्षित चित्रपटाची चर्चा सुरु होती. पण आता प्रेक्षकांची प्रतीक्षा लवकरच संपणार असं दिसतंय. क्रिश ४ या चित्रपटावर काम सुरु झालं असून तो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे.
SD Social Media
9850 60 3590