राज्यात राष्ट्रपती राजवट लागणार? जयंत पाटलांच्या ‘त्या’ वक्तव्यानं चर्चेला उधाण

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू शकते असं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलं होतं. त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा राष्ट्रपती राजवटीबाबत मोठं विधान केलं आहे.  सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागला आणि संबंधित आमदारांवर अपात्रतेची कारवाई झाली तर शिवसेनेचे आमदार पुन्हा उद्धव ठाकरेंकडे परततील. आमदार उद्धव ठाकरेंकडे आल्यास भाजप नेतृत्वाला राष्ट्रपती राजवटीशिवाय दुसरा पर्यायच उरणार नाही, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. ते सांगलीत बोलत होते.

राष्ट्रवादी कर्नाटक निवडणूक लढवणार? 

राष्ट्रवादी कर्नाटक निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का? या प्रश्नाला देखील यावेळी जयंत पाटील यांनी उत्तर दिलं आहे. कर्नाटक विधानसभा निवडणूक लढवायची की नाही, याबाबतचा निर्णय शरद पवार आणि पक्षाचे इतर वरिष्ठ नेते घेतील. मी एक छोटा कार्यकर्ता असल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून देखील यावेळी जयंत पाटील यांनी सरकारला जोरदार टोला लगावला आहे. या सरकारकडून शेतकऱ्यांना कोणतीही मदत मिळालेली नाही, हे सरकार सर्व आघाड्यावर अपयशी ठरल्याची टीका जयंत पाटील यांनी केली आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की हे सरकार फक्त ठेकेदार आणि बिल्डरचे आहे. हे सरकार शेतकरी आणि शेतमजुरांचं नसल्याची खात्री आता महाराष्ट्रातील जनतेला पटली आहे. जयंत पाटील यांनी राष्ट्रपती राजवटीबाबत केलेल्या वक्तव्यानं पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.