प्रो कबड्डी लीगचा थरार आजपासून

प्रो कबड्डी लीगचा हा आठवा सीझन आहे. स्पर्धेतील सगळ्या सामन्यांसाठी काही नियम आहेत. कोरोनामुळे सबस्टिट्यूटची संख्या पाच केली आहे. जाणून घेऊया स्पर्धेच्या काही नियमांबद्दल….

सामन्याच्यादिवशी सर्व संघ जास्तीत जास्त १२ आणि कमीत कमी 10 खेळाडू संघात ठेऊ शकतात. यामध्ये एक परदेशी खेळाडू असणं आवश्यक आहे. एकावेळी सात खेळाडू सामना खेळतील. उर्वरित तीन ते पाच खेळाडूंना सबस्टिट्यूट म्हणून सामन्यात संधी मिळू शकते.

एक सामना 40 मिनिटांचा असेल. यात 20-20 मिनिटांचे दोन हाफ असतील. दोन हाफ टाइममध्ये पाच मिनिटांचा इंटरवल असेल. इंटरवलनंतर दोन्ही संघांची साईड बदलली जाईल.

प्रतिस्पर्धी संघाच्या प्रत्येक खेळाडूला बाद केल्यानंतर एक-एक गुण मिळेल. ऑलआउट केल्यास दोन एक्स्ट्रा पॉईंट मिळतील.

सामन्यादरम्यान दोन्ही संघांना विश्रांतीसाठी 90 सेकंदांचा वेळ दिला जाईल. पंचांच्या अनुमतीनंतर कर्णधार, कोच किंवा खेळाडू टाइम आऊटचा पर्याय निवडू शकतात. 40 मिनिटांमध्ये या टाइमआऊटचा समावेश नाहीय. टाइम आऊट दरम्यान मैदान सोडता येणार नाही. नियमांचे उल्लंघन केले, तर प्रतिस्पर्धी संघाला बोनस पॉईंट मिळेल.
सामन्या दरम्यान कुठल्या खेळाडूला दुखापत झाली किंवा बाधा आली, तर मॅच रेफरी किंवा पंच टाइम आऊट जाहीर करु शकतात. याचा टीमच्या टाइम आऊटमध्ये समावेश होणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.