राज्यात चांगला पाऊस झाल्याने यंदा पाणीटंचाई जाणवणार नाही

गेल्या वर्षी राज्यात चांगला पाऊस झाला. परिणामी यंदा राज्यातील सर्वच विभागात पुरेशा प्रमाणात जलसाठा उपलब्ध आहे, त्यामुळे यंदा पाणीटंचाईचा सामना करावा लागणार नाहीये. उन्हाळा सुरू झाला आहे. उन्हाळा सुरू होऊनही राज्यातील धरणांमध्ये सध्या स्थितीमध्ये 67 टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे यंदा पाण्याचा तुटवडा जाणवणार नसल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

यंदा धरणात गेल्या वर्षीच्या तुलनेत आठ टक्के जलसाठा अधिक आहे. तसेच यंदा राज्यातील सर्वच विभागात चांगला पाऊस झाल्याने ग्रामीण भागात देखील जलसाठा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. पावसामुळे विहीरी तुडुंब भरल्यामुळे यंदा राज्यात पाणीटंचाई जाणवणार नाही.

प्राप्त आकडेवारीनुसार सद्यास्थितीमध्ये औरंगाबाद विभागातील धरणांमध्ये 70 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तर अमरावती विभागातील धरणांमध्ये 63 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. नागपूर विभाग 53, पुणे विभाग 72 आणि नाशिक विभागात 61 टक्के पाणीसाठी शिल्लक आहे. राज्यातील धरणांमध्ये यंदा पुरेशा प्रमाणात जलसाठा शिल्लक असल्यामुळे पाणीटचांई जाणवणार नसल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. मराठवाडा आणि विदर्भात कायमच दुष्काळी परिस्थिती असते. उन्ह्याळ्यात पाणीटंचाईच्या तीव्र झळा येथील नागरिकांना बसतात. मात्र यंदा हे चित्र बदलले आहे. मराठवाड्यातील धरणामध्ये तब्बल सत्तर टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

राज्यातील सर्वच विभागात चांगला पाऊस पडला त्यामुळे मोठ्या धरणांसोबतच लघू व मध्यम धरणात देखील पुरेसा जलसाठा उपलब्ध आहे. ग्रामीण भागाला व अनेक छोट्या शहरांना तलावातून पाणीपुरवठा करण्यात येतो, यावर्षी तलावात देखील पुरेसा पाणीसाठा उपलब्ध आहे. पाऊस चांगला झाल्याने ग्रामीण भागातील विहिरी आजही तुडुंब भरलेल्या असून, ग्रामीण भागातील महिलांची पाण्यासाठी करावी लागणारी पायपीट वाचली आहे. सोबतच पावसामुळे रब्बी हंगाम देखील जोरात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.