महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा खळबळ उडाली आहे. विशेषत: राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात खूप मोठी खळबळ उडाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कारण भाजप नेते मोहित कंबोज यांनी एक सूचक ट्विट केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचा आणखी एक खूप बडा नेता जेलमध्ये जाणार आहे, असं मोहित कंबोज त्यांच्या ट्विटमध्ये म्हणाले आहेत.
भाजप नेते मोहित कंबोज आणि किरीट सोमय्या यांच्या ट्विटचा आजपर्यंत इतिहास आहे. त्यांनी केलेल्या आरोपांनंतर राज्यात तशा हालचाली घडल्या आहेत. त्यांनी आरोप केल्यानंतर राजकीय नेत्यांवर ईडी आणि सीबीआयची कारवाई झाली आहे. त्यामुळे मोहित कंबोज यांच्या ट्विटने खळबळ उडाली आहे. विशष म्हणजे मोहित यांचं हे ट्विट अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर दबाव तंत्र म्हणून आहे की त्या आरोपांमध्ये खरं तथ्य आहे? असा सवाल उपस्थित होतोय.
मोहित कंबोज यांनी केलेल्या आरोपांप्रकरणी ते लवकरच पत्रकार परिषद घेणार आहेत. त्याबद्दल त्यांनी स्वत: माहिती दिली आहे. संबंधित नेत्याचा आपण खुलासा करणार असल्याचं कंबोज म्हणाले आहेत. संबंधित नेत्याच्या देशात आणी परदेशात असलेल्या मालमत्ता, बेनामी कंपनीज, खास मैत्रिणीच्या नावावर असलेली मालमत्ता (ती खास मैत्रीण कोण ?), मंत्री म्हणून जबाबदारी असलेल्या अनेक खात्यांच्या माध्यमातून केलेला घोटाळा, कौटुंबिक उत्पन्न आणि मालमत्ता या सगळ्यांबाबत मोठा खुलासा करणार असल्याचा दावा मोहित कंबोज यांनी केला आहे.