तापमानाचा पारा 50 अंशांवर जाण्याची शक्यता

राज्यात एप्रिल महिन्यात मोठ्या प्रमाणात उष्णता वाढली. पारा 45 अंशाहून अधिक गेला. आता हवामान विभागाने अलर्ट जारी केला आहे. तापमानाचा पारा 50 अंशांवर जाण्याची शक्यता व्यक्त केली आहे. राज्यात उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचं दिसत आहे.

हवामान खात्याकडून धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. मे महिन्यात उकाड्यापासून दिलासा मिळण्याची शक्यता कमी झाली आहे. तापमानाचा पारा वाढणार असल्याने काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

पूर्व मोसमी पावसामुळे उष्णतेची लाट घटण्याचा अंदाज आहे. चंद्रपुरात 122 वर्षांतील सर्वात उच्चांक तापमानाची नोंद करण्यात आली आहे. उष्णतेच्या लाटांमुळे आधीच मेटाकुटीला आलेल्या नागरिकांना आणखी काही दिवस सूर्याचा प्रकोप सहन करावा लागणार आहे.

काही ठिकाणी तर पारा 50 अंशाच्याही पुढे जाण्याचा इशारा हवामान खात्यानं दिलाय. महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, दिल्ली, हरियाणा, झारखंडमधील नागरिकांना उन्हाच्या झळांनी नागरिक हैराण झालेत.

वर्धामध्ये गेल्या 5 दिवसापासून तापमानात सातत्याने वाढ होते. आता कमाल तापमान 45.1 अंशावर पोहोचला आहे. विदर्भात तापमानबाबत वर्धा चौथ्या क्रमांकावर राहिलं आहे. वाढत्या तापमानाने नागरिक हैराण झाले आहेत.

यवतमाळ जिल्ह्यात उन्हाचा तडाखा दरदिवशी वाढत असून 45.2 अंश विक्रमी तापमानाची नोंद झाली आहे. गेल्या 8 दिवसात तापमानाचा पारा 6 अंश उंचीवर गेला आहे. सकाळी 8 वाजेपासूनच उन्हाचे चटके जाणवत असल्याने नागरिक घराबाहेर निघणं टाळत आहेत.

पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात तापमानाचा पारा 44 अंशावर पोहचला. पण अशा कडाक्याच्या उन्हात शिरूर तालुक्यातील चांडोह गावात बैलगाडा शर्यत झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.