नीरज चोप्राने रचला इतिहास, ‘रुपेरी’ कामगिरीमुळे जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेतील पदकांचा दुष्काळ संपला

भालाफेकपटून नीरज चोप्रामुळे पुन्हा एकदा भारतीयांची मान अभिमानने उंच झाली आहे. जागतिक अॕथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहचत नीरच चोप्राने सिल्वर मेडलवर आपलं नावं कोरलं आहे.नीरज चोप्राने भारताला ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवून देऊन इतिहास रचला.

नीरज चोप्राने 18 व्या जागतिक अॕथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भालाफेकच्या अंतिम फेरीत रौप्य पदक जिंकले आहे. नीरजने जागतिक अॕथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भालाफेकच्या अंतिम फेरीत 88.13 मीटरच्या सर्वोत्तम प्रयत्नांसह रौप्य पदक जिंकणारा पहिला भारतीय पुरुष खेळाडू बनून इतिहास रचला. अँडरसन पीटर्सने 90.46 मीटरच्या सर्वोत्तम प्रयत्नाने सुवर्णपदक जिंकले.

39 वर्षांचा दुष्काळ संपला

18 वर्षांपूर्वी जागतिक अॕथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताने कांस्यपदक जिंकले होते. 2003 मध्ये अनुभवी अॕथलीट अंजू बॉबी जॉर्जने लांब उडीत भारताला कांस्य पदक मिळवून दिले होते. मात्र नीरज चोप्राने एक पाऊल पुढे जात आज देशाला सिल्वर मेडल मिळवून दिलं आहे. जागतिक अॕथलेटिक्स चॅम्पियनशिप प्रथम 1983 मध्ये आयोजित करण्यात आली होती. तेव्हापासून भारताला या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकता आलेले नाही

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.