11 वर्षाखालील मुलांनाही देणार कोरोना प्रतिबंधक लस

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अकरा वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना देखील लसीची चाचणी सुरू केल्याची माहिती फायजर कंपनीने दिली आहे. जागतिक लसीकरण मोहिमेमधील पुढच्या टप्प्याची ही सुरुवात असल्याचं मानलं जात आहे. फायझरने सहकारी कंपनी असणाऱ्या बायोएनटेकच्या मदतीने या चाचण्या सुरु केल्याचं स्पष्ट केलं आहे. सहकारी कंपनी असणाऱ्या बायोएनटेकच्या मदतीने आम्ही फायझर-बायोएनटेक कोव्हिड १९ लसीची सुरक्षा, सहनशीलता आणि रोगप्रतिकारशक्ती संदर्भातील चाचणी करण्यासाठी जागतिक मोहिमेअंतर्गत अभ्यासादरम्यान निरोगी बालकांना लस दिली आहे,” असं कंपनीने म्हटलं आहे.

कंपनीने याआधीच १२ ते १५ वयोगटातील मुलांसाठी कोरोनाप्रतिबंधक लसीची चाचणी सुरु केलीय. अमेरिकेमध्ये आपत्कालीन प्राधिकरणाने १६ वर्षे आणि त्यावरील व्यक्तींना लसीकरणाची परवानगी दिली आहे. फायझर, मॉडर्ना, एस्ट्राजेनेकाने लहान मुलांवरील लसींच्या चाचण्या करण्यास सुरुवात केलीय. तर जॉन्सन अँड जॉन्सन सध्या लहान मुलांना देण्यात येणाऱ्या लसीवर संशोधन करत आहे. लहान मुलांना कोरोनाच्या संसर्गाची शक्यता वयस्कर व्यक्तींपेक्षा कमी असली तरी कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका नाकारता येत नाही. लहान मुलांना कोरोना संसर्गाचा अधिक त्रास होत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळेच लहान मुलांसाठीही लस निर्माण करण्याचा सल्ला अनेक आरोग्य तज्ज्ञांनी दिला आहे. फायझरचे प्रवक्ते शेरॉन कॅस्टिलो यांनी २०२१ च्या दुसऱ्या सहामाईमध्ये मुलांवरील लसीच्या चाचण्यांसंदर्भातील निकाल समोर येतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.