आज दि.६ फेब्रुवारी च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा.

भारतरत्न लता मंगेशकर यांचं निधन

भारतरत्न आणि भारताच्या गानकोकिळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या लता मंगेशकर यांचं निधन झालं आहे. वयाच्या ९२ वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रकृती बिघडल्याने त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. लता मंगेशकर यांच्या निधनामुळे संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. लता मंगेशकर यांना ८ जानेवारीला करोनाची लागण झाली होती. त्यांना करोनाची सौम्यं लक्षणं जाणवत होती. प्रकृतीत सुधारणा होऊ लागल्यानंतर २८ जानेवारीला त्यांना व्हेंटिलेटरवरुन काढण्यात आलं होतं. मात्र ५ फेब्रुवारीला प्रकृती बिघडल्याने त्यांना पुन्हा व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं. पण उपचादारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा म्हणून राज्य सरकारने सोमवार ७ फेब्रुवारी २०२२ रोजी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.

लता मंगेशकर यांच्या निधनाच्या वृत्तानंतर ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन, मनसे प्रमुख राज ठाकरे आणि त्यांचे कुटुंबीय, प्रसिद्ध पार्श्वगायक सुरेश वाडकर यांच्यासह अनेक दिग्गजांनी अंत्यदर्शन घेतलं.

वाइन विक्रीचा निषेध, अण्णा हजारे
प्राणांतिक उपोषण करणार

राज्य सरकारने सुपरमार्केटमध्ये वाइन विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा निषेध करत सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे प्राणांतिक उपोषण करणार आहेत. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना स्मरणपत्र पाठवलं आहे. पत्रात त्यांनी लिहिलंय की, “सरकारच्या सुपरमार्केटमध्ये वाइन विक्री करण्याच्या नियमांसंदर्भात वाईन विक्रीच्या निर्णयामुळे राज्यातील मुलांच्यावर जी आमची खरी संपत्ती आहे. या बालकामध्येच उद्याचे महापुरूष निर्माण होणार आहेत. युवाशक्तीच राज्य आणि राष्ट्र घडवू शकेल यावर आमचा विश्वास आहे.

उद्धव ठाकरे यांच्याविरोधात
गुन्हा दाखल करणार

पुणे महापालिकेमध्ये जात असताना भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर शिवसैनिकांनी धक्काबुक्की केली. किरीट सोमय्या धक्काबुक्की दरम्यान पायऱ्यांवरून घसरून पडले. संजय राऊत यांच्या सांगण्यावरून ही धक्काबुक्की करण्यात आल्याचा आरोप पुणे भाजप शहराध्यक्षांनी केला होता. तर भाजप नेत्यांनी या घटनेचा निषेध केला आहे. पुण्यातील संचेती रुग्णालयाचे किरीट सोमय्यांनी आभार मानले. काल जी दुखापत झाली. उद्धव ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करणार असल्याचे सोमय्या म्हणाले.

राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या
पुतळ्याची अमेरिकेत तोडफोड

अमेरिकेत राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या पुतळ्याची तोडफोड करण्यात आली आहे. यामुळे भारतीय-अमेरिकन नागरिकांमध्ये असंतोषाचं वातावरण निर्माण झालं आहे. काही अज्ञातांनी मॅनहट्टन येथील युनियन स्क्वेअरजवळ असणाऱ्या या ८ फूट उंच पुतळ्याची तोडफोड केली आहे. अमेरिकेतील भारतीय राजदुतावासाकडून या घटनेचा निषेध करण्यात आला आहे. दुतावास हा घटनेचा अत्यंत तीव्र शब्दांमध्ये निषेध करत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. या प्रकरणाची चौकशी व्हावी यासाठी दुतावासाने स्थानिक प्रशासन आणि स्टेट डिपार्टमेंटकडे विनंती केली आहे.

पेट्रोल डिझेलच्या
किंमती भडकणार

कच्च्या तेलाच्या किंमती कडाडल्या आहेत. कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये विक्रमी वाढ झाली आहे. त्यामुळे पेट्रोल डिझेलचा पुन्हा एकदा भडका उडणार आहे. सौदी अरेबियाने कच्चा तेलाच्या किंमतीत विक्रमी वाढ केली आहे. भारतासह आशियातील इतर देश, अमेरिका आणि युरोपला ९५ डॉलर्स प्रति बॅरलने तेल दिलं जात आहे. याचा थेट परिणाम जनतेच्या खिशावर होणार असून पेट्रोल डिझेलच्या किंमती भडकणार आहेत.

लता मंगेशकर यांच्या निधनाबद्दल
भारतीय खेळाडू दंडावर काळी पट्टी

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना ६ फेब्रुवारी रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे, ज्यामध्ये भारतीय खेळाडू दंडावर काळी पट्टी बांधून मैदानात उतरले आहेत. गानकोकिळा लता मंगेशकर यांचे आज रविवारी सकाळी ८.१२ वाजता निधन झाले. भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनाबद्दल भारत सरकारने देशात दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

SD social media
9850 60 35 90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.