‘वास्तव’ फेम ज्येष्ठ अभिनेते सुनील शेंडे काळाच्या पडद्याआड; मराठीसह हिंदी चित्रपटात कमावलं नाव
सिनेसृष्टीतून दररोज वाईट बातम्या समोर येत आहेत. कालच मराठी मनोरंजन सृष्टीतून एक वाईट बातमी समोर आली. लोकप्रिय मराठी मालिका ‘तुझ्यात जीव रंगला’ फेम अभिनेत्री कल्याणी कुरुळे-जाधव हिचा अपघाची मृत्यू झाला. तिच्या जाण्याने मराठी सिनेसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात असताना आज अजून एक वाईट बातमी समोर आली आहे. मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते सुनील शेंडे यांचे निधन झाले आहे.
मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते सुनील शेंडे यांचे निधन झाले आहे. ते ७५ वर्षांचे होते. रात्री १ वाजता मुंबईतील विले पार्ले याठिकाणी असणाऱ्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सुनील शेंडे यांच्यावर दुपारी १ वाजता पारशीवाडा याठिकाणी असणाऱ्या स्मशानभूमित अंत्यसंस्कार केले.
‘…मग फडणवीसांसह सगळ्यांचेच राजीनामे घ्यावे लागतील’, खडसेंचा बावनकुळेंवर पलटवार
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात महिलने विनयभंगाचा आरोप केला, यानंतर आव्हाडांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपानंतर जितेंद्र आव्हाड यांनी आपण राजीनामा देत असल्याचा इशारा दिला. यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जितेंद्र आव्हाड यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी केली आहे. शरद पवारांनी जितेंद्र आव्हाड यांचं निलंबन करावं. आव्हाड यांचं समर्थन करणाऱ्यालाही या गुन्ह्यात घ्यायला हवं, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
चंद्रशेखर बावनकुळे यांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी पलटवार केला आहे. ‘देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांवर अनेक गुन्हे दाखल आहेत. जर का गुन्हे दाखल झाल्यानंतर राजीनामे घेतले जात असतील, तर प्रत्येकाचा राजीनामा मागायचा का? जितेंद्र आव्हाड यांच्यावर जाणीवपूर्वक गुन्हे दाखल केले जात असल्याचं चित्र आहे, असं एकनाथ खडसे म्हणाले.
बालदिनादिवशी अनिरुद्धचा चाहत्यांना अनोखा सल्ला
आई कुठे काय करते मालिकेतून सध्या महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेले अभिनेते मिलिंद गवळी एव्हरग्रीन अभिनेते म्हणून ओळखले जात आहे. मालिकेत त्यांनी साकारलेल्या अनिरुद्धला तोड नाही. प्रेक्षकांनी अनिरुद्धला भरभरुन प्रेम दिलं आहे. मिलिंद गवळी सोशल मीडियावरही फार सक्रीय असतात. अनेक फोटो व्हिडीओ तसंच त्यांच्या भावना ते पोस्टमधून लिहित असतात. ते मालिकेतील सहकलाकारांबद्दल तसेच विविध किस्से, अनुभव नेहमीच शेअर करत असतात. आज बालदिनानिमित्त मिलिंद गवळींनी खास पोस्ट शेअर केली आहे. त्याची सध्या चर्चा होतेय.
मिलिंद गवळींनी सोशल मीडियावर एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी त्यांचे लहान मुलांसोबतचे विविध फोटो शेअर केले आहेत. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलंय कि, ”खरंतर आपल्यासाठी रोजच बाल दिन असायला हवा, खरंच लहान मुलांमुळे ,जग सुंदर आहे, आपल्या सगळ्यांचे जीवन सुंदर आहे, आणि लहान मुलं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे, त्यांच्या उज्वल भविष्यासाठी आपल्याला प्रामाणिक कष्ट करायला हवेत, निसर्गाची , पर्यावरणाची , आपल्या या पृथ्वीची,आज आपण काळजी घेतली तर भविष्यामध्ये त्यांना एक सुंदर जग जगायला मिळेल.”
“सक्तीचं धर्मांतर गंभीर मुद्दा” सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश
देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीनं सक्तीचं धर्मांतर हा गंभीर मुद्दा असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. या मुद्द्यावर भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिले आहेत. या समस्येवर केलेल्या उपाययोजनांबाबत आठवड्याभराच्या आत माहिती देण्यासही केंद्र सरकारला सांगण्यात आलं आहे.
देशात सक्तीचं धर्मांतर होत असेल, तर हा खरंच गंभीर मुद्दा आहे. याचा परिणाम देशाच्या सुरक्षेसह नागरिकांच्या धार्मिक स्वातंत्र्यावर होऊ शकतो”, असं न्यायमूर्ती एनआर शाह आणि हिमा कोहली यांच्या खंडपीठाने म्हटले आहे.
बालदिनाच्या दिवशी करण जोहर घेऊन आला लोकप्रिय ‘डिस्को दिवाने’ गाण्याचं नवीन व्हर्जन, व्हिडीओ व्हायरल
करणला दोन मुलं आहेत, यश आणि रुही. तो नेहमीच त्याच्या मुलांसाठी काही ना काही नवीन गोष्टी करत असतो. आता आज जागतिक बाल दिनानिमित्त त्याने त्याच्या मुलांचा एक खास व्हिडीओ पोस्ट केला आहे. करण जोहरची निर्मिती असलेला ‘स्टुडंट ऑफ द इयर’ हा चित्रपट प्रचंड गाजला. या चित्रपटातील ‘डिस्को दिवाने’ हे गाणं ही प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. आता या चित्रपटाचं एक अनोखं व्हर्जन करणच्या मुलांनी त्याला गाऊन दाखवलं आहे.
धोनी भाजपामध्ये करणार प्रवेश?
भारताचा माजी कर्णधार आणि सध्या चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार असलेला महेंद्र सिंग धोनी पुन्हा एकदा चर्चेत आहे. झालं असं की नुकतीच धोनीने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीदरम्यानचा एक फोटो व्हायरल झाला आहे. अनेकांनी या फोटोवरुन धोनी राजकीय इनिंग तर सुरु करणार नाही ना यासंदर्भातील प्रश्न उपस्थित केला आहे.
व्हायरल झालेल्या फोटोमध्ये धोनी आणि अमित शाह हस्तांदोलन करताना दिसत आहेत. चेन्नईमधील एका कार्यक्रमादरम्यान या दोघांची भेट झाली. इंडिया सिमेंट्स या कंपनीला ७५ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये हे दोन्ही मान्यवर उपस्थिती होते. भारतीय क्रिकेट नियमन मंडळाचे माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांच्या मालकीची ही कंपनी आहे. एन. श्रीनिवासन हेच इंडियन प्रमियर लीगमधील चेन्नईच्या संघाचे मालक आहेत. धोनी आणि श्रीनिवासन यांचे फार घनिष्ट संबंध असल्याने धोनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होता.
2024 T20 वर्ल्ड कपमध्ये विराट खेळेल की रोहित? माँटी पानेसरनं वर्तवलं भाकीत
ऑस्ट्रेलियातील आश्वासक प्रदर्शनानंतर, रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारताचा इंग्लंडविरुद्ध अॕडलेड ओव्हलवर झालेल्या उपांत्य फेरीत १० गडी राखून पराभव झाला. त्यानंतर या फॉर्मेटमधून कोणाला वगळले जाऊ शकते याकडे आता बोटे दाखवली जात असताना, माजी इंग्लिश फिरकीपटू माँटी पानेसरचे मत आहे की विराट कोहली अजूनही २०२४ च्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत खेळू शकतो. कारण तो अत्यंत तंदुरुस्त आहे. पण त्याला वाटत नाही की, रोहित शर्मा दोन वर्षांनी होणाऱ्या स्पर्धेत सहभागी होईल.
SD Social Media
9850 60 3590