पंतप्रधान नरेंद्र मोदी हैदराबादमध्ये संत आणि समाज सुधारक रामानुजाचार्य यांच्या पुतळ्याचे अनावरण करणार आहेत. या पुतळ्याचे अनावरणानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी हैदराबादच्या दौऱ्यावर आहेत. 2 वाजून 45 मिनिटांनी इंटरनॅशनल कॉर्प्स रिसर्च इन्सिट्यूट सेमी एरिड ट्रॉपिक्स (ICRISAT) पाहणार आहेत. त्यानंतर सायंकाळी पाच वाजता समानतेचा आदर्श असणाऱ्या रामानुजाचार्य यांचा पुतळा देशाला समर्पित करणार आहेत. उभारण्यात आलेल्या रामानुजाचार्य यांच्या पुतळ्याची उंची 216 फूट असून 11व्या शतकातील संत रामानुजाचार्य यांच्या स्मरणार्थ हा समतेचा पुतळा उभारण्यात आला आहे.
मानवतेबाबत असणाऱ्या श्रद्धा, जात यांच्यासह जीवनातील अनेक गोष्टींमध्ये त्यांनी समानतेचा विचार मांडला आहे. जगातील ही सर्वात मोठी अशी दोन नंबरची मूर्ती असून हा पुतळा 1800 टनाचा आहे. तर पंचधातूंचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये सोने, चांदी, तांबे, पितळ आणि जस्ताचा वापर केला आहे. मंदिर परिसर आणि या पुतळ्याची संकल्पना त्रिदंडी चिन्ना जियर स्वामी यांची आहे.
कार्यक्रमप्रसंगी रामानुजाचार्य यांचा जीवनपट आणि शिक्षणावर 3D प्रेझेंटेशन असणार आहे. यादरम्यान, आम्ही समानतेच्या पुतळ्याभोवती असलेल्या 108 दिव्या देशांच्या समान मनोरंजनाला देखील भेट देऊ.
रामानुजाचार्य हे महान सुधारक होते. ज्यांनी 1 हजार वर्षापूर्वी समाजातील अनिष्ठ रूढी परंपरांना छेद देण्याचा प्रयत्न केला. रामानुजाचार्य यांचा पुतळा म्हणजे समानतेचा पुतळा आहे. त्याचे अनावरण बुधवारपासून 12 दिवस असणाऱ्या रामानुज सहस्त्राब्दी समारोपप्रसंगी केले जाणार आहे. वैष्णव संत रामानुजाचार्य यांची 1000 वी जयंतीनिमित्त सुरु झालेल्या या कार्यक्रमामध्ये 2 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारीपर्यंत 1 हजार 35 कुंडांतून 14 दिवस महायज्ञाचा कार्यक्रम केला जाणार आहे.
रामानुजाचार्यांच्या पुतळ्याच्या अनावरण करण्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी इंटरनॅशनल कॉर्प्स रिसर्च इन्सिट्यूट सेमी एरिड ट्रॉपिक्सच्या 50 व्या वर्धापन दिनाच्या समारोप कार्यक्रमाला सुरुवात करणार आहेत. यावेळी ते रिसर्च फॅसिलिटीी आणि रॅपिड जनरेशन अॅडव्हान्समेंटचे उद्घाटन करणार आहेत. या दोन्हा सुविधा आशिया आणि उप-सहारा आफ्रिकेतील अल्पभूधारक शेतकऱ्यांना समर्पित केले जाणार आहे. याक्षणी या कार्यक्रमानिमित्त पोस्टाच्या तिकिटाचेही अनावरण करण्यात येणार आहे. ICRISAT ही आंतरराष्ट्रीय संस्था असून आशिया आणि उप सहारा आफ्रिकेतील विकासासाठी कृषीविषयक संशोधन करते.