Oscar 2023: मराठी सिनेमाचा डंका सातासमुद्रापार! राहुल देशपांडेचा ‘मी वसंतराव’ ऑस्कर वारीत
द अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस यांनी नुकतीच 95 व्या ऑस्करसाठीची जगभरातील 301 सिनेमांची रिमांइंडर लिस्ट जाहीर करण्यात आली. ‘द काश्मीर फाइल्स’, ‘कांतारा’ सारख्या भारतीय सिनेमांनी ऑस्करच्या यादीत नाव कमावलं. त्यानंतर आता मराठी सिनेसृष्टीसाठी आनंदाची आणि गर्वाची माहिती समोर आलीये ती म्हणजे ‘मी वसंतराव’ या मराठी सिनेमाचाही301 सिनेमांच्या रिमांइंडर यादीत समावेश झाला आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेता गायक, संगीतकार आणि अभिनेता राहुल देशपांडे यानं पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे.
समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरुच; 14 रानडुकरांच्या मृतदेहांचा खच
राज्यातील समृद्धी महामार्गावर होत असलेल्या अपघातांच्या घटनेत वाढ होत आहेत. यानंतर आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. समृद्धी महामार्गावर अज्ञात वाहनाने 14 रानडुकरांना चिरडले आहे. ही घटना मध्यरात्रीच्या सुमारास नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यात आजनगाव जवळ घडली. अपघातानंतर क्षतिग्रस्त वाहन घेऊनच वाहनचालक फरार झाला आहे. यानंतर एवढ्या मोठ्या संख्येने रानडुक्कर समृद्धी महामार्गावर आलेच कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.समृद्धी महामार्गाचे दोन्ही बाजूला संरक्षण भिंत असून वन्यप्राणी समृद्धी महामार्गावर येऊ शकणार नाही, असा दावा केला गेला होता. त्यामुळे काल रात्री अंजनगाव जवळ रानडुकरांचा कळप समृद्धी महामार्गावर कसा आला, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
निवडणूक आयोगात शिंदेंनी टाकला ‘बॉम्ब’, ठाकरेंना बसणार सगळ्यात मोठा धक्का!
शिवसेना कुणाची? याबाबत निवडणूक आयोगातल्या सुनावणीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने मोठा बॉम्ब टाकला आहे. उद्धव ठाकरे यांचं पक्षप्रमुखपदच बोगस आहे, असा खळबळजनक दावा शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी निवडणूक आयोगातल्या सुनावणीवेळी केला. महेश जेठमलानी यांनी शिवसेनेची घटना तसंच पक्षाची रचना काय आहे? हे निवडणूक आयोगाला सांगितलं. संघटनेची जुनी घटना, नवीन घटना आणि पक्षाची रचना यावर युक्तीवाद केला.’शिवसेनेची जुनी घटना शिवसेना प्रमुख बाळासाहेब केंद्रीत होती, पण नंतर ती न बदलत उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पक्षप्रमुख असे नाव स्वत:साठी घेतले, पण त्यामुळे ते शिवसेनेचे प्रमुख होत नाहीत. बाळासाहेबांचं निधन झाल्यावर उद्धव ठाकरे यांनी स्वत:कडे सगळे अधिकार घेणार बदल केले. शिवसेनेच्या घटनेत बदल करणं हा बोगसपणा आहे, त्यामुळे उद्धव ठाकरे यांचं पक्षप्रमुखपदच बेकायदेशीर आहे,’ असा दावा एकनाथ शिंदे यांच्या गटातर्फे महेश जेठमलानी यांनी केला आहे.
ठाकरे सरकार जाताच, शिवभोजन थाळीची लागली वाट, ठेकेदारांवर उपासमारीची वेळ
बेघर आणि गोरगरिबांना अल्पदरात भोजन देवून त्यांची भूक भागविणाऱ्या शिव भोजन केंद्र चालकांवरच आता उपासमारीची वेळ आली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून सोलापूर जिल्ह्यातील शिव भोजन केंद्राचे सुमारे 60 लाख रुपयांचे अनुदान थकले आहे. परिणामी वेळेवर अनुदान न मिळाल्याने 32 पैकी तब्बल 15 शिवभोजन केंद्रांना कायमचे टाळे लागले आहे. जिल्हा पुरवठा विभागातील अधिकार्यांच्या उदासिनतेमुळे शासनाच्या या चांगल्या योजनेचे सोलापूर जिल्ह्यात तीनतेरा वाजले आहेत.
कवाडे शिंदेंसोबत आल्याने आठवले नाराज, भाजपने आरपीआयला स्पष्टच सांगितलं!
एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांच्या शिवसेनेने जोगेंद्र कवाडे यांच्यासोबत युती केली आहे. शिंदे आणि कवाडे यांची युती झाल्यामुळे भाजपसोबत असलेले आरपीआयचे रामदास आठवले नाराज झाले आहेत. जोगेंद्र कवाडे यांना घेताना माझ्याशी चर्चा करायला हवी होती, त्यांना घेण्याची गरज नाही, असं रामदास आठवले म्हणाले.
जोगेंद्र कवाडे यांच्यासोबत एकनाथ शिंदेंनी युती केल्याने रामदास आठवले नाराज झाले, याबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना विचारण्यात आलं, तेव्हा त्यांनी आरपीआयने आरपीआयचं काम करावं, कवाडे सरांचं समर्पण मोठं आहे, असं बावनकुळे म्हणाले.
रन मशीननं सचिन, पॉन्टिंगलाही टाकलं मागे! श्रीलंका विरुद्ध विराट कोहलीचं दमदार शतक
भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात सुरु असलेल्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात विराट कोहलीने श्रीलंके विरुद्ध दमदार नाबाद शतक ठोकल आहे. या शतकासह विराटने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि विकी पॉन्टिंग यांनाही मागे टाकले आहे. भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील पहिला वनडे सामना आसामच्या गुवाहाटी येथील बारसापारा स्टेडियमवर खेळवला जात आहे. विस्फोटक फलंदाज विराट कोहलीचे हे 72 वे शतक असून केवळ 80 चेंडूत त्याने शतक पूर्ण केले आहे.भारत विरुद्ध श्रीलंका त्यांमध्ये सुरु असलेल्या वनडे मालिकेच्या पहिल्या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. भारतीय संघाकडून प्रथम सलामीच्या फलंदाजीसाठी रोहित शर्मा आणि शुभमन गिल मैदानात आले. यात शुभमन गिल 60 चेंडूत 70 धावा करून तर रोहित शर्मा 67 चेंडूत 83 धावा करून माघारी परतला. शुभमन गिल बाद झाल्यानंतर आलेल्या विराट कोहलीने संघाची कमान सांभाळली आणि सुरुवातीपासूनच उत्तम खेळी केली. विराट कोहलीने या शतकासह आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्याचे 72 वे तर वन डे क्रिकेट मधील 45 व्या शतकाचा टप्पा गाठला आहे. विराट कोहलीने 80 चेंडूत 10 चौकार आणि एका षटकाराच्या सहाय्याने शतक पूर्ण केलं.विराटने आपल्या एकदिवसीय कारकिर्दीतील ४५वे शतक पूर्ण करत भारतीय संघाला ३७३ एवढी मोठी धावसंख्या उभारून दिली. हे त्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ७३वे शतक ठरले.
“केरळ ही माझी कर्मभूमी”, शशी थरूर यांचे राज्याच्या राजकारणात सक्रिय होण्याचे संकेत
काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी केरळ विधानसभा निवडणूक लढवण्याबाबत संकेत दिले आहेत. त्यांनी केरळच्या राजकारणात आपलं स्वारस्य दाखवलं आहे. सोमवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना थरूर म्हणाले की, प्रत्येकाची इच्छा आहे की त्यांनी आपल्या राज्यात काम करावं. त्यामुळे ते लोकांच्या इच्छेविरोधात जाऊ शकत नाहीत. काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवल्यानंतर थरूर यांनी केरळच्या राजकारणात स्वारस्य दाखवलं आहे. त्यामुळे आगामी केरळ विधानसभा निवडणुकीत थरूर यांना संधी मिळणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
SD Social Media
9850 60 3590