आतापर्यंत २०२ शाळा
रशियाने केल्या नष्ट
रशियन क्षेपणास्त्रांनी राजधांनी किव्ह जवळील झायटोमिरमधील एक शाळा उद्ध्वस्त केली आहे. सर्व शैक्षणिक संस्था बंद असल्याने अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही. रशियन सैन्याने आतापर्यंत २०२ शाळा, ३४ रुग्णालये आणि १,५०० हून अधिक निवासी इमारती नष्ट केल्या, असं वृत्त प्रेसने दिलंय.
तेलाची किंमत प्रति बॅरल
३०० च्या पार जाऊ शकते
रशियन तेलावरील बंदीमुळे जागतिक बाजारपेठेवर गंभीर परिणाम होतील. किंमतीतील वाढ ही प्रचंड जास्त असेल. तेलाची किंमत प्रति बॅरल ३०० च्या पार जाऊ शकते,” असा इशारा नोव्हाक यांनी रशियन वृत्तसंस्थांशी बोलताना दिलाय. तसेच “या किमती वाढल्यास त्या कमी होण्यास एक वर्षापेक्षा जास्त वेळ लागेल आणि युरोपियन ग्राहकांना ते महागात पडेल. त्यामुळे युरोपियन राजकारण्यांनी विचारपूर्वक निर्णय घ्यावेत. कारण गॅस स्टेशन, विजेच्या आणि हीटिंगच्या किमती गगनाला भिडतील,” असे ते म्हणाले
नंदुरबार, जळगाव नाशिक जिल्ह्यात
वादळी वारा गारपिटीची शक्यता
राज्यात एकीकडे मोठ्या प्रमाणात उन्हाच्या झळा बसत आहेत. तर दुसरीकडे अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील 2 दिवस कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. पुढील 48 तासात धुळे नंदुरबार जळगाव नाशिक मेघगर्जनेसह वादळी वारा गारपिटीची शक्यता आहे. तर औरंगाबाद, जालन्यात मेघगर्जनेसह गारपीट होण्याचाही अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन
संपण्याच्या मार्गावर
एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनासंदर्भात समिती स्थापन करण्याच्या सूचना विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी सरकारला दिल्या आहेत. आझाद मैदानामध्ये आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांसोबत चर्चा करण्याच्या सूचनाही सभापतींनी दिल्या आहेत. तर याबाबत आपण चर्चेसाठी समिती स्थापन करण्यास तयार असल्याचे राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी म्हटले आहे. एसट्या राज्य सरकारमध्ये विलिनीकरण व्हावे या मागणीसाठी अजूनही कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु आहे.
ममता बॅनर्जी यांच्या विमानाचा
अपघात होता होता वाचला
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या वैमानिकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली. ममता बॅनर्जी यांनी आपला जीव वाचवल्याबद्दल वैमानिकाचे आभार मानले आहेत. ममता बॅनर्जी यांनी सोमवारी विधानसभेत या घटनेबद्दल सांगताना म्हटलं की, “मी बनारसमधून परतत होती. यावेळी अचानक दुसरं विमान माझ्या विमानासमोर आलं. वैमानिकाने प्रसंगावधान दाखवलं आणि विमान अचानक ८ हजार फूट खाली आणलं. १० सेकंद जरी उशीर झाला असता तर मोठी दुर्घटना झाली असती.
महिला घरही सांभाळतात आणि देशही
सांभाळतात : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुख्यमंत्र्यांनी रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा उल्लेख केला. रशियानं युक्रेनवर हल्ला चढवल्यानंतर युक्रेनमधील अनेक महिला देखील युद्धात सहभागी झाल्याचं दिसून आलं आहे. त्यासंदर्भात बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, “रशिया-युक्रेनचं युद्ध सुरू आहे. तिथल्या महिला बंदुका घेऊन रस्त्यावर उतरल्या आहेत. त्या घर देखील सांभाळतात आणि देश देखील सांभाळतात. ही झेप काही लहान गोष्ट नाही”, असं मुख्यमंत्री म्हणाले.
राष्ट्रवादीच्या ज्वाला धोटे बरळल्या,
बलात्कार वारांगणांवर करा, सुसंस्कृत महिलांवर नको
बलात्कार करायचा असेल तर वारांगणांवर करा, पण सुसंस्कृत महिलांवर नको असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या अर्बन सेलच्या अध्यक्षा ज्वाला धोटे यांनी केलं आहे. नागपुरातील वारांगणांनी पोलिसांनी केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ आंदोलन केलं. पोलिसांनी एका ६० वर्षीय महिलेवर तडीपारीची कारवाई केली असून त्याचा निषेध करण्यासाठी या महिलांनी मानवी साखळी करत आंदोलन केलं. आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्या ज्वाला धोटे यांनी हे वक्तव्य केलं.
विमान अपहरणातील
दहशतवाद्यांची हत्या
इंडियन एअरलाइन्सच्या विमान क्रमांक आयसी-८१४ चं अपहरण करुन त्यामधील रुपिन कात्याल याच्या मृत्यूस कारणीभूत ठरणारा दहशतवादी ठार झालाय. या विमानाचं अपहरण करणाऱ्या पाच दहशतवाद्यांपैकी एक असणाऱ्या मिस्री झाहूर इब्राहिम ऊर्फ जमाइलला कराचीमध्ये एक मार्च रोजी एका अनोळखी बाईकस्वाराने गोळ्या घालून ठार केलं. मसूद अझरचा मोठा भाऊ इब्राहिम अझर आणि रौफ असगर हे दोन दहशतवादी अद्यापही जिवंत असून ते जागतिक स्तरवरील दहशतवाद्यांच्या यादीत आहेत.
SD social media
9850 60 35 90